शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या लष्करी शाळेचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक; पाकिस्तानातून पाठवण्यात आले अश्लील फोटो

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 14:47 IST

गोपळगंजच्या हथुआ स्थित लष्करी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक करुन त्यावर अश्लील फोटो आणि मेसेज टाकण्यात आले आहेत.

गोपाळगंजबिहारच्या गोपाळगंज येथील लष्करी शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅग ग्रूप हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे हॅकिंग पाकिस्तानमधून झाल्याचं सांगितलं जात आहे. 

गोपळगंजच्या हथुआ स्थित लष्करी शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रूप हॅक करुन त्यावर अश्लील फोटो आणि मेसेज टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्कराच्या माहितीसाठी ही धोक्याची चिन्ह असल्याचं शाळेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. 

पाकिस्तानी नंबरवरुन व्हॉट्सअॅप ग्रूप हॅकव्हॉट्सअॅपवर ज्या ग्रूपच्या माध्यमातून विद्यार्थी ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होत असत तो ग्रूप हॅक करुन त्यावर अश्लील फोटो टाकण्यात आले आहेत. परदेशातून हे हॅकिंग झालेले असल्याने प्रकरण गंभीर असल्याचं व्यवस्थापनानं म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपवर ज्या नंबरवरुन अश्लील पोस्ट आणि मेसेज टाकण्यात आले आहेत तो नंबर पाकिस्तानचा असल्याचं समोर आलं आहे. 

लष्करी शाळेचा थेट संरक्षण मंत्रालयाशी संबंध असल्याने आणि पाकिस्तानातून हॅकिंग झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात हॅकर विरोधात एफआयआर दाखल केली असून चौकशीला सुरुवात झाली आहे.    

टॅग्स :BiharबिहारWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप