शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ेसुरेशदादांविषयी बोलणारे खडसे पाणी योजनांबाबत गप्प का? गुलाबराव पाटील : पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय आरोपींमध्ये असल्याने गूपचिळी

By admin | Updated: November 26, 2015 23:57 IST

जळगाव- सोनवद, वाघळूद खुर्द, आव्हाणे अशा गुर्जरबहुल अनेक गावांमध्ये भाजपाचे पी.सी.पाटील यांनी पाणी योजना आणल्या. त्यात चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याने चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. पण या प्रकरणी जि.प.ने अधिकार्‍यांवर कारवाई केली नाही. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना गुन्हे दाखल करूनही अटक केली नाही. या प्रकरणातील आरोपी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंचे निकटवर्तीय आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यांचा बचाव सर्व यंत्रणांनी केला, असा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

जळगाव- सोनवद, वाघळूद खुर्द, आव्हाणे अशा गुर्जरबहुल अनेक गावांमध्ये भाजपाचे पी.सी.पाटील यांनी पाणी योजना आणल्या. त्यात चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याने चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. पण या प्रकरणी जि.प.ने अधिकार्‍यांवर कारवाई केली नाही. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना गुन्हे दाखल करूनही अटक केली नाही. या प्रकरणातील आरोपी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंचे निकटवर्तीय आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यांचा बचाव सर्व यंत्रणांनी केला, असा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
सुरेशदादांच्या मुद्द्यावर एकनाथराव खडसेंनी विधानसभेपासून अनेक सभांमध्ये आगपाखड केली. आता तर पाणी योजनांमध्ये अपहार झाल्याचे उखड झाले आहे. कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला, पण ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. आता खडसे याबाबत बोलतील का, सुरेशदादांविषयी खडसे कसे गावोगावी जाऊन बोलत होते, आरोप करीत होते, असा प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आरोपी पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय
अस्तित्वात नसलेल्या दुकानातून पाणी योजनेचे साहित्य खरेदी झाल्याचे दाखविले गेले. चौकशीत हा प्रकार उघड झाला. एवढा मोठा भ्रष्टाचार झाला. या प्रकरणात एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय पी.सी.पाटील यांचे बंधू सुभाष पाटील, हिरालाल पाटील हे आरोपी आहेत. त्यांचा बचाव करण्यात आला. खडसेंचे निकटवर्तीय आरोपी असल्याने ना पोलिसांनी कारवाई केली ना जिल्हा परिषदेने दोषींविरुद्ध वसुली केली, असेही आमदार पाटील म्हणाले.

या प्रकरणातील आरोपी जि.प.चे तत्कालीन कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघ आणि सहायक कार्यकारी अभियंता सुधीर डहाके यांचे जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, पण पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. आव्हाणीचे उपसरपंच रमेश माणिक पाटील यांनी स्वत: खर्च करून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले. एक तक्रारदार न्यायालयात आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी फिरतो, पण त्याला न्याय मिळत नाही ही बाब यंत्रणांसाठी लाजीरवाणी आहे. मोठ्या पुढार्‍यांच्या बगलबच्च्यांनी मोठा डल्ला मारावा आणि मोकळे व्हावे. त्यांचे कुणीच काहीच वाकडे करू शकत नाही, असा चुकीचा संदेश यानिमित्त गेला आहे.
तीन बैठकांमध्ये प्रश्न मांडला, आता विधानसभेत बोलेल
मी मागील तीन डीपीडीसीच्या बैठकांमध्ये कल्याणेहोळ, सोनवद खुर्द, वाघळूद व इतर पाणी योजनांप्रकरणी कारवाईची मागणी करीत आहे. पण त्याची दखल प्रशासन, पालकमंत्री घेत नाही. याला काय म्हणावे? पुढे विधानसभेत हाप्रश्नमांडेल,असेहीपाटीलम्हणाले.