शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालला टार्गेट केले जातंय, लोकशाही वाचवा; ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 07:01 IST

पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या एसआयआरवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत थेट युक्तिवाद केला. पश्चिम बंगालला टार्गेट केले जात असून, येथील जनतेवर 'बुलडोझर' चालवला जात आहे. आम्हाला कुठेही न्याय मिळत नाहीये, लोकशाही वाचवा, अशी कळकळीची विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या एसआयआरवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत थेट युक्तिवाद केला. पश्चिम बंगालला टार्गेट केले जात असून, येथील जनतेवर 'बुलडोझर' चालवला जात आहे. आम्हाला कुठेही न्याय मिळत नाहीये, लोकशाही वाचवा, अशी कळकळीची विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

ममतांच्या याचिकेची व विद्यमान मुख्यमंत्र्याने केलेल्या दुर्मीळ युक्तिवादाची दखल न्यायालयाने घेत पात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत राहिलीच पाहिजेत, असे म्हटले. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची व न्या. विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने आयोग व प. बंगालच्या निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून ९ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागवले आहे.

आरोप-प्रत्यारोप

निवडणूक आयोगाच्या वतीने ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी आरोप फेटाळून लावले आणि आरोप केला की, राज्य सरकारने एसआयआरसाठी केवळ ८० उपविभागीय दंडाधिकारी, अंगणवाडी सेविकांसारखे कर्मचारी दिले. ममतांनी आरोप फेटाळून लावत सांगितले की, आयोगाने जे काही मागितले होते, ते सर्व राज्याने उपलब्ध करून दिले आहे. दरम्यान, ममतांनी युक्तिवाद करण्यासाठी ५ मिनिटे मागितली. त्यावर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी १५ मिनिटे घ्या, असे सांगितले. त्याबद्दल ममतांनी खंडपीठाचे आभार मानले.

पात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत राहिली पाहिजेत

खंडपीठाने सांगितले की, मतदार यादीच्या पुनरीक्षणामध्ये कधीकधी स्थलांतराचाही समावेश असतो, परंतु पात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत राहिली पाहिजेत. प्रत्येक समस्येवर उपाय असतो आणि आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की, कोणताही निरपराध व्यक्ती वगळला जाणार नाही.

निवडणूक आयोग हे ‘व्हॉट्सअ‍ॅप कमिशन’

ममता यांनी निवडणूक आयोगाला ‘व्हॉट्सअ‍ॅप कमिशन’ असे संबोधत आरोप केला की, आधार कार्ड मान्य करण्याबाबत न्यायालयाचे आदेश असूनही अडथळे आणले जात आहेत. इतर राज्यांत विविध कागदपत्रे मान्य असताना बंगाललाच वेगळा निकष का? असा सवाल त्यांनी  केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee seeks Supreme Court intervention, alleges West Bengal is targeted.

Web Summary : Mamata Banerjee argues in Supreme Court that West Bengal is being targeted regarding voter lists. She pleads for democracy to be saved. The court seeks response from election officials, emphasizing that eligible voters must remain on the rolls.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालSupreme Courtसर्वोच्च न्यायालय