शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

भाजपने बाहेरच्या लोकांना आणले आणि कोरोनाचा अधिक फैलाव झाला; ममता दीदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 8:48 PM

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलकोरोना परिस्थितीवरून साधला निशाणाबाहेरील लोकांच्या चाचण्या होत नसल्याचा दावा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. त्यातच आता कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. भाजपने बाहेरच्या लोकांना आणले आणि कोरोना अधिक प्रमाणावर फैलावला, असा दावा ममता दीदींना केला आहे. (mamata banerjee criticised bjp over corona situation)

नौपाडा येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी सदर टीका केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावरूनही ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करत निशाणा साधला.

 निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

बाहेरून आलेल्यांच्या चाचण्या नाही

पाच महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात होता. मात्र, भाजपने बाहेरून लोकांना आणले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. इतकेच नव्हे, तर त्या लोकांची कोरोना चाचणीही करण्यात आलेली नाही. लोकं बाहेरून येऊन कोरोना पसरवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक रॅली, प्रचारसभा यांमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवून कोलकाता उच्च न्यायालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राजकीय कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे होणारे पालन यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

बंगालमध्ये ४२० टक्के कोरोना रुग्णवाढ

पाच राज्यांतील निवडणुकांपैकी सर्वाधिक चर्चा आहे, ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेकांनी बंगालमध्ये तळ ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत कोरोना संसर्गालाही मोठा जोर आल्याचे चित्र आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत बंगालमध्ये ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत बंगालमध्ये ४१ हजार ९२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गरज असेल, तेथे कोरोना नियमांचे पालन व्हावे, यासाठी कलम १४४ लागू करावे, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगावर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण