शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

मे-जून नाही, तर फेब्रुवारीपासूनच उन्हाळा सुरू होणार! IMD ने जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 22:05 IST

Weather Update: देशातील अनेक राज्यांमध्ये यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Weather Update: गेल्या काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव सातत्याने कमी होताना दिसतोय. सकाळी आणि रात्री थंडी जाणवते, तर दिवसभर उष्णतेचा पारा वाढतोय. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) शुक्रवारी (31 जानेवारी, 2025) माहिती दिली की, जानेवारीमध्ये हवामान उष्ण आणि कोरडे राहिले, परंतु फेब्रुवारीमध्ये देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच, यंदा उन्हाळा लवकर येण्याची शक्यता आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, जानेवारीच्या उष्णतेनंतर फेब्रुवारीमध्ये देशातील बहुतांश भागात तापमान वाढण्याची आणि सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, पश्चिम-मध्य आणि उत्तर-पश्चिम भारतातील काही भाग वगळता बहुतांश भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भाग वगळता बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील.

जानेवारीमध्ये सरासरी 4.5 मिमी पावसाची नोंदमृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले की, भारतात जानेवारी महिन्यात सरासरी 4.5 मिमी पाऊस झाला. जानेवारीत देशाचे सरासरी तापमान 18.98 अंश सेल्सिअस होते, जे 1901 नंतरचे या महिन्यातील तिसरे सर्वोच्च तापमान होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 हा देखील 1901 नंतरचा सर्वात उष्ण महिना होता. 

पिकांसाठी पाऊस महत्त्वाचा तत्पूर्वी, हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला होता की, जानेवारी ते मार्च दरम्यान उत्तर भारतात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसारखी राज्ये हिवाळ्यात (ऑक्टोबर ते डिसेंबर) आणि उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) रब्बी पिके घेतात. त्यांना वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होणारा हिवाळी पाऊस या पिकांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. 

टॅग्स :Indiaभारत