शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 11:23 IST

कलम 370बद्दल काँग्रेसचा मोठा दावा

देहरादून: कलम 370 बद्दल भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान देणाऱ्या भाजपालाकाँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही कलम 370 मधील तरतुदींची तीव्रता 12 वेळा कमी केली. मात्र यामुळे एकदाही वाद निर्माण झाला नाही, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी केला. आम्ही एक-दोनदा नव्हे, तर 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली. त्यातल्या तरतुदी सौम्य केल्या. मात्र यामुळे एकदाही वादंग निर्माण झाला नाही, असं खेडा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. देश वादातून नव्हे, तर संवादातून चालतो. काँग्रेसला या गोष्टीची कल्पना आहे. मात्र भाजपाला ही बाब समजत नाही. कारण त्यांचं संपूर्ण राजकारणच वादावर चालतं, अशी टीका खेडा यांनी केली. काँग्रेस पक्षाची कलम 370बद्दलची भूमिका जराही बदललेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपा सरकारनं ज्याप्रकारे कलम 370 हटवलं, त्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. कारण कलम 370 काढून काढण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब करण्यात आला, त्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे, असं खेडांनी म्हटलं. कलम 370 सोबतच वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीवरुनही खेडांनी भाजपाला लक्ष्य केलं. जीएसटी लागू करताना भाजपा सरकारनं घिसडघाई केली. त्यामुळे छोटे व्यापारी, उत्पादक आणि शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, असं खेडा म्हणाले. नोटबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था ढासळली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनीदेखील नोटबंदी केली होती. मात्र त्यामुळे कोणताही वाद निर्माण झाला नव्हता. त्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेला फटका बसला नव्हता. मात्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानं अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला, अशी टीका खेडा यांनी केली.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370congressकाँग्रेसBJPभाजपा