शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागात पाणी टंचाईचे संकट

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

पावसाची दडी : शंभर टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा

पावसाची दडी : शंभर टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा

पुणे : जुलै आणि आता ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने टंचाईचे संकट गंभीर होत चालले असून, पुणे विभागात आजअखेर टँकरची संख्या शंभरवर गेली आहे. ऐन पावसाळ्यात विभागातील तब्बल अडीच लाख नागरिकांना पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास आगामी काळात गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाने दडी मारल्याने विभागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ही टंचाई काही प्रमाणात कमी होती. परंतु, चालू हंगामात पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळेच ऑगस्ट महिना उजाडला तरी टँकर कमी झालेले नाहीत. जून महिन्यात काही भागात झालेल्या चांगल्या पावसामुळे टँकरची संख्या ४८ पर्यंत कमी झाले होती. परंतु, संपूर्ण जुलै आणि आता ऑगस्टचे १८ दिवस कोरडे गेल्याने टँकरची मागणी पुन्हा वाढली आहे. त्यामुळे दीड महिन्यात टँकरची संख्या पुन्हा शंभरवर गेली आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचे अनेक स्त्रोत आटू लागले असून, पावसाची ओढ अशीच कायम राहिल्यास भविष्यात टँकर भरण्यासाठी देखील पाण्याचे स्त्रोत उपलब्ध होतील किंवा नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.
विभागात पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ९० गावे आणि तब्बल ५५४ वाड्यावस्त्यांमध्ये आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी १४७ खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, सातारा जिल्ह्यातील माण, कोरेगाव, फलटण, सांगली जिल्ह्यात जत, खानापूर तालुक्यातील हजारो लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विभागात सर्वात जास्त ३४ टँकर सांगली जिल्ह्यात पुणे-२५, सातारा २८ आणि सोलापूर जिल्ह्यात १३ टँकर सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यात सन २०१४ मध्ये याच तारखेला तब्बल १७९ टँकर सुरु होते.

विभागात सुरु असलेले जिल्हानिहाय टँकर
जिल्हाटँकरची संख्यागावे-वाड्याबाधीत लोकसंख्या
पुणे२५१३-१५४४५६७६
सातारा२८३५-१६८५६२५३
सांगली३४३३-२३३८७०६८
सोलापूर१३११-१०४१९४५
कोल्हापूर००-००
---
एकूण१००९२-६५४२५०८१५
---