शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

पार्सल देण्यासाठी जात होती घरोघरी; झोमॅटो गर्लला मिळाली काँग्रेसची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 20:12 IST

काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमेघनाला मंगळुरु शहर पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.पुढे तिने सांगितले की, फूड डिलिव्हरीचे काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.

मंगळुरु - कर्नाटकमधील मंगळुरु फूड डिलेव्हरी एक्झ्युकेटीव्ह आता दारोदारी फूड डिलेव्हरी करता करता पालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार आहे. मेघना दास असं या मुलीचं असून ती झोमॅटोसाठी फूड डिलेव्हरी एक्झ्युकेटीव्ह म्हणून काम करते. मेघनाला मंगळुरु शहर पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

मेघना मन्नागुड्डा वॉर्डमधून निवडणुक लढवणार आहे. याबाबत बोलताना मेघना यांनी सांगितले की, बंगळुरू येथून तिच्या करियरला सुरुवात केली आणि तेथे ती हेवलेटसाठी नोकरी करायची. नंतर ती नोकरीसाठी दुबईला गेली. काही दिवसांनी ती पुन्हा भारतात आली. जेव्हा ती भारतात पुन्हा आली त्यावेळी तिने नोकरी शोधण्यास प्रयत्न केले. त्यावेळी १५ हजारपेक्षा जास्त पगाराची नोकरी शोधणं अवघड झालं होत. म्हणून तिने झोमॅटोमध्ये फूड डिलेव्हरी एक्झ्युकेटीव्ह म्हणून नोकरीसाठी रुजू झाल्याने मेघनाने एएनआयशी बोलताना सांगितले.पुढे तिने सांगितले की, फूड डिलिव्हरीचे काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यावेळी तिला तिच्या मित्राने काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी नेले. फूड डिलेव्हरी करताना खराब रस्त्यांमुळे मी अनेकदा रस्त्यावर पडले. सुरक्षेच्या दृष्टीने याकडे लक्ष दिले पहिले असे  गाऱ्हाणे तिने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला सांगितले. त्यावर या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर काँग्रेस नेत्याने मला पालिकेची निवडणूक लढविण्याबाबत विचारणा केली असल्याचे मेघनाने सांगितले. अखेरीस मला उमेदवारी मिळाली. देवाची कृपा झाली आणि मतदारराजाने मला पाठिंबा देऊन निवडणूक जिंकण्यास बळ दिले आहे. मी खराब रस्ते सुधारण्याकडे, महिलांची सुरक्षा, पाण्याची समस्या सोडविण्याचे प्रयत्न करेन. तसेच माझ्या वॉर्डात मी अनेक समस्या पहिल्या असून त्या समस्या मी सोडविणार असल्याचे मेघनाने सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसcivic issueनागरी समस्याElectionनिवडणूक