शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

'वनी' पुन्हा चर्चेत, काश्मीरचा सुपुत्र करणार देशाचं रक्षण

By admin | Updated: September 12, 2016 09:44 IST

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा वनी हे नाव चर्चेत आलं आहे. मात्र, यावेळेस बुरहान वनी नाही तर बीएसएफचे सहायक कमाडंट परिक्षेचे टॉपर नबील अहमद वनी आहेत

-ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.१२ - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी 'बुरहान वणी' मारला गेल्यामुळे एकीकडे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच त्याच काश्मीरमध्ये 'वनी' या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र हा 'वनी' म्हणजे काश्मीरचा सुपूत्र बीएसएफचे सहायक कमाडंट परिक्षेतील टॉपर नबील अहमद वनी होय..  २६ वर्षीय नबील अहमद वनी देशाच्या रक्षणासाठी लवकरच सीमा सुरक्षा दलामध्ये सहायक कमांडंट म्हणून रुजू होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतीच वनी यांची भेट घेतली. बीएसएफच्या प्रमुखांनीच वनी आणि सिंग यांची भेट घालून दिली. उधमपूरच्या या तरूणाचं कौतूक करताना राजनाथ यांनी 'तुम्ही' राज्यातील तरूणांचे आदर्श असल्याचं म्हटलं आहे. 
नबील अहमद सीमा सुरक्षा दलामध्ये सहायक कमांडंट म्हणून रूजू होणार असून त्यांच्या या यशामुळे त्यांची आई हनीफा बेगम देखील आनंदी आहे. मुलाची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करतानाच ' माझा मुलगा पूर्ण इमानदारी आणि मेहनतीने काम करून देशात शांतता कायम राखण्यासाठी कायम प्रयत्नशील असेल' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
नबीलने मिळवलेलं यश म्हणजे काश्मिरमधील तरूण किती प्रभावशाली आहेत हेच दाखवतं, ते कश्मीरी तरूणांसाठी प्रेरणादायी आहेत असं राजनाथ सिंग म्हणाले. जम्मू-काश्मिरच्या सुरक्षेसंबंधी झालेल्या बैठकीतही वणी यांची उपस्थिती होती. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, आयबीचे प्रमुख दिनेश्वर शर्मा, गृह सचिव राजीव महर्षि आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर वनी म्हणाले, बेरोजगारी ही तरूणांपुढील सर्वात मोठी समस्या आहे आणि शिक्षण हा एकमेव त्यावरील उपाय आहे. वनी यांनी पठाणकोटमधून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. हातात दगड घेऊन शिक्षण घेता येत नाही मात्र हातात लेखणी घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. वनी यांचे वडील शिक्षक होते त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.
 
काश्मीरमधील बुरहान वनी या दहशतवाद्यामुळे एकीकडे खोरं पेटलेलं असताना त्याच खो-यातील एक तरूण देशाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहे. 
(दहशतवादी बुरहान वनी समर्थनार्थ श्रद्धांजली कार्यक्रमात हाफिज सईदचीहजेरी)
(दहशतवादी बुरहानला पाकिस्तानने घोषित केले 'शहीद')
  •  
 
  •