शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

इराकमध्ये मारल्या गेलेल्या ३८ भारतीयांचे मृतदेह घेऊन व्ही के सिंह भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 15:23 IST

विशेष विमानातून सर्व मृतदेह घेऊन ते अमृतसरला पोहोचले.

नवी दिल्ली  - युद्धग्रस्त इराकमध्ये ठार मारल्या गेलेल्या ३८ भारतीयांचे मृतदेह आणण्यासाठी इराकला गेलेले परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह मायदेशी परतले आहेत. विशेष विमानातून सर्व मृतदेह घेऊन ते अमृतसरला पोहोचले. तिथे पंजाब सरकारमधील मंत्रीही उपस्थित आहेत. तिथून विशेष विमान कोलकात्याकडे रवाना होईल आणि पुढे पाटण्याला जाईल. त्या-त्या ठिकाणी हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाणार आहेत. 

जून २०१४ मध्ये इसिस या दहशतवादी गटाने इराकच्या मोसूल गावातून ४० भारतीयांचे अपहरण केले होते. एकाने मी बांगलादेशचा मुस्लीम असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ही माहिती स्वराज यांनी संसदेत गेल्या मार्चमध्ये सांगितली होती. या भारतीयांचे मृतदेह मोसूलच्या वायव्येकडील बदूश गावात ताब्यात घेण्यात आले, असे स्वराज म्हणाल्या होत्या. ठार मारण्यात आलेल्या ३९ जणांमध्ये पंजाबचे २७, हिमाचल प्रदेशचे चार, पश्चिम बंगालचे दोन व उर्वरित बिहारचे आहेत. त्यातील ३८ जणांचे मृतदेह भारतात आणण्यात आलेत. या संपूर्ण प्रक्रियेत इराक सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल व्ही के सिंह यांनी त्यांचे आभार मानले. 

पंजाब सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.  


टॅग्स :Islamic Stateइस्लामिक स्टेटSushma Swarajसुषमा स्वराज