‘व्हीआयटी’च्या प्रवेश परीक्षा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी प्रवेशाबाबत घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:12 AM2020-07-13T05:12:26+5:302020-07-13T05:13:06+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक होत आहे. विद्यार्थी आणि पालक यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेश परीक्षा (व्हीआयटीईईई-२०२०) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

VIT entrance exam canceled; Decided to enter engineering on the background of Corona | ‘व्हीआयटी’च्या प्रवेश परीक्षा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी प्रवेशाबाबत घेतला निर्णय

‘व्हीआयटी’च्या प्रवेश परीक्षा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी प्रवेशाबाबत घेतला निर्णय

googlenewsNext

वेल्लोर : तामिळनाडूतील वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने (व्हीआयटी) २०२० च्या प्रवेशासाठीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. व्हीआयटीकडून वेल्लोर, चेन्नई, अमरावती (आंध्र प्रदेश) आणि भोपाळ (मध्यप्रदेश) येथील संस्थांमधील विविध शाखांच्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेतल्या जातात.
कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक होत आहे. विद्यार्थी आणि पालक यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेश परीक्षा (व्हीआयटीईईई-२०२०) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रवेश आता बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांच्या गुणांच्या आधारे होतील. तसेच, जेईईमध्ये चांगले गुण घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. व्हीआयटीच्या वेबसाईटवर याबाबतचे अर्ज www.vit.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
अर्जदारांनी व्हीआयटीईईईचे अर्ज लवकर अपडेट करावेत. बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर मार्क अपलोड करता येतील. याबाबत काही माहिती हवी असल्यास टोल फ्री नंबर १८००१०२०५३६ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच, ईमेल ugadmission@vit.ac.in अथवा व्हॉटसअ‍ॅप क्रमांक ९५६६६५६७५५ यावर संपर्क करावा.

Web Title: VIT entrance exam canceled; Decided to enter engineering on the background of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.