शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

बेवफा सनम! सरकारी नोकरी मिळताच नवऱ्याला दिला डच्चू; सासरच्या घरी राहण्यासाठी १ कोटींची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 20:37 IST

कानपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पत्नीला सरकारी नोकरी मिळताच तिने पतीची साथ सोडली आहे.

आपल्याकडे एखाद्याच्या घरी सरकारी नोकरी मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला जातो. पण, उत्तर प्रदेशमध्ये एका परिवारात पत्नीला सरकारी नोकरी मिळाल्यामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आली आहे. एका तरुणाने त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींवर मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पत्नी सरकारी नोकरी मिळाल्यानंतर सोडून जाण्याची धमकी देत ​असून १ कोटी रुपयांची मागणीही करत असल्याचा आरोप तरुणाने केला आहे. या तरुणाने कानपूर पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे.

वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नौबस्ता येथील हंसपुरमचे आहे. एका खासगी शाळेचे व्यवस्थापक बजरंग भदोरिया यांचे लग्न २२ फेब्रुवारी २०२३ रोजी साहिबाबाद येथील रहिवासी लक्षिता यांच्याशी झाले होते. काही महिन्यांपूर्वी लक्षिताला दिल्लीत सरकारी शिक्षिकेची नोकरी मिळाली. यानंतर, बजरंगच्या सासरचे लोक आले आणि लक्षिताला सोबत घेऊन जाऊ लागले. कारण विचारले असता, तिने सांगितले की ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहून काम करेल आणि तिला वाटेल तेव्हा सासरच्या घरी येईल. 

यावेळी बजरंगच्या कुटुंबाने याचा विरोध केला तेव्हा त्याच्या सासरच्यांनी त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी तिच्या सासरच्या घरी आली आणि काहीच कारण नसताना भांडण करून परत गेली. १२ डिसेंबर रोजी लक्षिता तिचे वडील राम माधव, आई संतोष आणि भाऊ अनिल यांच्यासोबत शाळेत आली आणि भांडू लागली. तसेच १ कोटी रुपयांची मागणी केली, असा आरोप बजरंग यांनी केला आहे.

जीवे मारण्याची धमकीही दिली

१२ डिसेंबर रोजी ती तिच्या शाळेत ड्युटीवर असताना पत्नी, सासू आणि सासरे तिथे आले आणि त्यांनी त्याला वैवाहिक संबंध तोडण्यास सांगितले. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला आहे. संपूर्ण घटनेनंतर, तरुणाने नौबस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि आता लवकरच पत्नी आणि सासरच्या लोकांची या प्रकरणात चौकशी केली जाईल. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत आणि योग्य ती कारवाई केली जाईल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPoliceपोलिस