Vikas Dubey Encounter: शेवटच्या चौकशीत विकास दुबेनं दिली मोठी कबुली; उत्तर प्रदेश पोलीस गोत्यात येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 10:14 AM2020-07-10T10:14:32+5:302020-07-10T10:17:26+5:30

Vikas Dubey Encounter: आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे पोलीस चकमकीत ठार

Vikas Dubey Encounter vikas Confesses That He Has Not Killed Co Devendra Mishra | Vikas Dubey Encounter: शेवटच्या चौकशीत विकास दुबेनं दिली मोठी कबुली; उत्तर प्रदेश पोलीस गोत्यात येणार?

Vikas Dubey Encounter: शेवटच्या चौकशीत विकास दुबेनं दिली मोठी कबुली; उत्तर प्रदेश पोलीस गोत्यात येणार?

googlenewsNext

उज्जैन: कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे एन्काऊंटरमध्ये मारला आहे. आज सकाळी विकासला कानपूरला आणलं जात असताना पोलिसांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर विकासनं एका पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विकास दुबे मारला गेला.

आठ पोलिसांच्या हत्याकांडानंतर उत्तर प्रदेश पोलीस विकासचा शोध घेत होते. संपूर्ण राज्यात त्याचा शोध सुरू होता. अखेर काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून विकास दुबेला अटक करण्यात आली. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यावेळी झालेल्या चौकशीत त्यानं शहीद सीओ देवेंद्र मिश्रा यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली. आपण मिश्रांचा तिरस्कार करायचो. त्यांच्या प्रत्येक हालचालीची माहिती पोलीस दलातील कर्मचारीच मला द्यायचे, असं विकासनं चौकशीत सांगितलं.

उत्तर प्रदेश पोलीस दलातील अनेक जण विकासच्या संपर्कात असल्याचं त्याच्या शेवटच्या चौकशीतून समोर आलं आहे. सीओ देवेंद्र मिश्रा यांनी केलेलं वैयक्तीक स्वरुपाचं भाष्यदेखील विकासपर्यंत पोहोचायचं. विकासच्या अटकेनंतर पोलिसांना कानपूर हत्याकांडाबद्दलची महत्त्वाची माहिती मिळाली. विकासच्या चौकशीतून समोर आलेला तपशील पोलिसांसाठी अतिशय धक्कादायक आहे.

सीओ देवेंद्र मिश्रा यांची हत्या केली नसल्याचं दुबेनं पोलिसांना सांगितलं. 'माझ्या माणसांनी देवेंद्र मिश्रा यांना मारलं. ते माझ्या पायाबद्दल अनेकदा बोलायचे. विकासचा एक पाय ठीक नाही आणि त्याचा दुसरा पाय मी ठीक करून टाकेन, असं देवेंद्र मिश्रा त्यांच्या सहकाऱ्यांना सांगायचे,' अशा पोलीस ठाण्यातल्या आतल्या गोष्टी विकासनं त्याच्या शेवटच्या चौकशीत सांगितल्या.

विकास दुबे आणि देवेंद्र मिश्रा यांच्यात अनेकदा वाद झाल्याची माहिती पोलीस दलातील सुत्रांनी दिली. 'देवेंद्र मिश्रा माझ्या विरोधात असल्याचं शेजारच्या पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मला मिश्रा यांचा प्रचंड राग यायचा. पण मी त्यांची हत्या केली नाही. मिश्रा माझ्या पायावरून टिप्पणी करायचे. त्यामुळे चिडलेल्या माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पायावरच वार केले आणि डोक्यात गोळी झाडली,' अशी माहिती दुबेनं पोलिसांना दिली.

आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं

गाडी उलटताच बंदूक हिसकावून विकास दुबेचा पळून जाण्याचा प्रयत्न; रस्त्याच्या शेजारीच एन्काऊंटरचा थरार

गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, जप्त केलेल्या ‘त्या’काळ्या बॅगेतून उलगडणार अनेक रहस्य

Web Title: Vikas Dubey Encounter vikas Confesses That He Has Not Killed Co Devendra Mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.