शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना लस सर्वदूर पाेहाेचविण्यासाठी जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 06:11 IST

केंद्राने माॅडर्ना, फायझर, सीरम इंस्टिट्यूट, भारत बायाेटेक आणि झायडस कॅडिला यांना लसीसाठी संपर्क केला आहे. या कंपन्यांच्या लसींना आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये ९० ते ९५ टक्के यश मिळाले आहे. 

नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणाऱ्या काेरानाचा संसर्ग राेखण्यासाठी लस पुढील वर्षी उपलब्ध हाेईल. नंतर खरे आव्हान असेल ते प्रत्येक घटकापर्यंत ती पाेहाेचविण्याचे. यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून प्रमुख विमानतळांवर परिवहन व्यवस्था तसेच आवश्यक तापमान नियंत्रण झाेन उपलब्ध  करुन देण्याची तयारी करण्यात येत आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त कार्गाे विमानांचे संचलन करण्यासाठी कार्गाे कंपन्यांनी तयारी केली आहे. 

केंद्राने माॅडर्ना, फायझर, सीरम इंस्टिट्यूट, भारत बायाेटेक आणि झायडस कॅडिला यांना लसीसाठी संपर्क केला आहे. या कंपन्यांच्या लसींना आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये ९० ते ९५ टक्के यश मिळाले आहे.  देशात औषधांच्या आयातीसाठी मुंबई हे सर्वात माेठे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळावर काेराेना लसीची ने-आण करणाऱ्या विमानांना उड्डाणासाठी गरजेनुसार प्राधान्याने स्लाॅट उपलब्ध करण्यात येईल, असे विमानतळावरील एका प्रवक्त्याने सांगितले. दिल्लीतील विमानतळावर २ कार्गाे टर्मिनल आहेत. तसेच उणे २० अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची साठवणूक यंत्रणा आहे. 

काेराेनाविरुद्धच्या लढणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. भारत बायाेटेककडून विकसित करण्यात येत असलेली ‘काेव्हॅक्सीन’ लस ६० टक्के प्रभावी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. अशा प्रकारची काेणतीही लस ५० टक्के प्रभावी ठरत असल्यास तिला मंजूरी मिळू शकते. काेव्हॅक्सीनचा प्रभाव ६० टक्क्यांहून जास्तही असू शकताे, असे कंपनीचे अध्यक्ष साई डी. प्रसाद म्हणाले. लस पुढील वर्षी दुसऱ्या तिमाहीत उपलब्ध हाेऊ शकते, असेही ते म्हणाले. 

या शहरांत साठवणुकीची सोयकाही कंपन्यांकडे मुंबई, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, काेलकाता, पुणे, अहमदाबाद आणि बंगळुरू या प्रमुख विमानतळांवर फार्मा ग्रेड कंडिशनिंग कक्ष आहे. या ठिकाणी कमी तापमानात लस साठविण्याची साेय आहे. त्यामुळे मागणीनुसार झटपट लस पाेहाेचविणे शक्य हाेईल. 

ग्रामीण भागात खरे आव्हान‘सेंटर फाॅर सेल्युलर अॲण्ड माॅलिक्यूलर बायाेलाॅजी’चे संचालक डाॅ. राकेश मिश्रा यांनी सांगितले, की देशात माेठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन तसेच वितरणाचे खरे आव्हान आहे. शहरी भागात साठवणुकीसाठी अडचणी कमी राहतील. मात्र, ग्रामीण भागात उणे ७० अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची साेय करणे अवघड ठरू शकते.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या