Video: Pakistan Army raises white flag at LoC to recover bodies of its Punjabi soldiers killed by Indian Army | Video: पाकिस्ताननं LoC वर फडकवलं पांढरं निशाण; भारतीय लष्करानं जिंकली मनं
Video: पाकिस्ताननं LoC वर फडकवलं पांढरं निशाण; भारतीय लष्करानं जिंकली मनं

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानाला भारतीय लष्कराच्या जवानांची चोख प्रत्त्युतर दिले आहे. जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सैनिक ठार झाले आहेत. मात्र, आतापर्यंत आपले सैनिक ठार झाले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानवर पांढरे झेंडे दाखवून सैनिकांचे मृतहेद घेऊन जाण्याची वेळ आली. याआधी अनेकदा पाकिस्तानने गोळाबार करत सैनिकांचे मृतदेह नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैनिकांना अपयश आले. त्यानंतर पाकिस्तानला पांढरे झेंडे दाखवावे लागले. 

जम्मू-काश्मीरमधील हाजीपूर सेक्टरमधील हा व्हिडीओ 10/11 सप्टेंबरच्या दरम्यानचा आहे. या व्हिडीओत दिसून येत आहे की, पाकिस्तानचे सैनिक पांढरे झेंडे घेऊन आपल्या सैनिकांचे मृतदेह घेऊन जात आहेत. या व्हिडीओच्या पुराव्यानंतर आपले सैनिक ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानला आता फेटाळणे कठीण जाणार आहे. दरम्यान, लष्काराच्या भाषेत सांगायचे झाल्यास पांढरा झेंडा हा आत्मसमर्पण किंवा युद्धविरामचे संकेत मानले जातात.  

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या ठार झालेल्या सैनिकांमध्ये गुलाम सरूलचा समावेश आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलनगर परिसात राहत होता. याआधी पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या अजून एका पंजाबी मुस्लीम सैनिकाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जोरदार गोळीबार केला होता. मात्र, भारतीय जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरामुळे अनेक प्रयत्न करुन सुद्धा पाकिस्तानला आपल्या सैनिकांचे मृतदेह नेता आले नाहीत. यानंतर मृतदेह परत नेण्यासाठी 13 सप्टेंबरला पांढरा झेंडा दाखवाव लागला.

याआधी पाकिस्ताने केरन सेक्टरमध्ये आपले 5 ते 7 सैनिक आणि दहशतवादी ठार झाले होते. मात्र पाकिस्तानी सैनिकांनी त्याचे मृतदेह परत नेले नाहीत. ते असे मानत होते की, ठार करण्यात आलेले सैनिक पंजाबमधील नसून ते काश्मीरचे किंवा नॉर्दन लाइट इन्फैंट्रीचे होते. दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांमध्ये पंजाबी मुस्लिमांचे जास्त प्राबल्य आहे. ते इतर सैनिकांना जास्त महत्त्व देत नाहीत. 
 

Web Title: Video: Pakistan Army raises white flag at LoC to recover bodies of its Punjabi soldiers killed by Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.