शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Video : आजी-आजोबांनी चोरट्यांना चोपलं; धाडस कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:08 IST

तामिळनाडूमधील एका वृद्ध दाम्पत्याने घरी चोरी करायला आलेल्या चोरांची चांगलीच धुलाई केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देतामिळनाडूमधील एका वृद्ध दाम्पत्याने घरी चोरी करायला आलेल्या चोरांची चांगलीच धुलाई केल्याची घटना समोर आली आहे. चोरांना घाबरून न जाता आजी-आजोबांनी चपला, खुर्च्या तसेच मिळेल त्या वस्तूने चोरांना खूप चोप दिला. अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या दाम्पत्याचं कौतुक केलं आहे.

मदुराई - चोरांनी घरावर हल्ला केला की अनेकदा सर्वजण घाबरून जातात किंवा अशावेळी काय करायचं हे सुचत नाही. मात्र तामिळनाडूमधील एका वृद्ध दाम्पत्याने घरी चोरी करायला आलेल्या चोरांची चांगलीच धुलाई केल्याची घटना समोर आली आहे. चोरांना घाबरून न जाता आजी-आजोबांनी चपला, खुर्च्या तसेच मिळेल त्या वस्तूने चोरांना खूप चोप दिला. या घटनेनंतर दाम्पत्याला घाबरून चोरटे पळून गेले. घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. तसेच याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  

तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका दाम्पत्याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी प्रवेश केला. 75 वर्षीय आजोबा रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराबाहेर बसले होते. चोरट्यांनी त्यांच्यावर पाठीमागून अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी आवाज ऐकून 68 वर्षी आजी घरातून बाहेर आल्या आणि त्यांनी पतीला वाचवण्यासाठी चोरट्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरांच्या हातात शस्त्र असलेली व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र त्या शस्त्रांना दाम्पत्य घाबरलं नाही आणि त्यांनी चोरांना चोख प्रत्युत्तर देऊन पळून लावलं.

आजी-आजोबांनी चपला, प्लास्टिक खुर्च्या, टेबल तसेच मिळेल त्या वस्तूने घराबाहेर आलेल्या दोन चोरट्यांना चोप दिला. चोरट्यांनी देखील त्याच्या हातातील धारदार शस्त्रांचा दाम्पत्याला धाक दाखवला. तसेच मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरिही वृद्ध दाम्पत्य घाबरले नाही. त्यांनी चोरांचा सामना केला. चोरांची धुलाई करताना प्लास्टिकची खुर्ची आणि स्टूल देखील तूटले आहेत. दाम्पत्याचा रुद्रावतार पाहून चोरांनीच हार मानली आणि तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना घराबाहेरील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून सर्वच स्तरातून आजी-आजोबांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या दाम्पत्याचं कौतुक केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ ट्विट करून braaaaavoooooooo !!!!! असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूtheftचोरीAmitabh Bachchanअमिताभ बच्चन