शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी मोरोक्को भेटीवर

By admin | Updated: May 31, 2016 06:22 IST

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या मोरोक्को आणि ट्यूनिशिया या आफ्रिकन देशांच्या पाच दिवसीय दौऱ्याचा सोमवारी प्रारंभ झाला.

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या मोरोक्को आणि ट्यूनिशिया या आफ्रिकन देशांच्या पाच दिवसीय दौऱ्याचा सोमवारी प्रारंभ झाला. त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये दिल्लीत आयोजित भारत-आफ्रिका शिखर परिषदेतून आफ्रिकन देशांसोबत निर्माण झालेल्या सौहार्द्रपूर्ण संबंधाचा राजनैतिक पातळीवर लाभ मिळवण्याचा प्रयत्न या भेटीतून होणार आहे.भारताचे उपराष्ट्रपती ५० वर्षांनंतर प्रथमच या दोन देशांना भेट देत आहेत. या दोन उत्तर आफ्रिकन देशांच्या नेत्यांसोबत ते दहशतवाद, संयुक्त राष्ट्र परिषदेचा विस्तार, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक तसेच आफ्रिकन देशांशी संपर्क वाढविण्यासह उपखंडीय मुद्यांवर चर्चेत भर देतील. मोरोक्कोचे पंतप्रधान अब्देलीलाह बेन्किरेन यांच्या निमंत्रणावरून भेट देत असलेले उपराष्ट्रपती अन्सारी १ जूनपर्यंत मोरोक्कोत थांबतील. राबात येथे इंडो- मारोक्को चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीचे ते संयुक्तरीत्या उद्घाटन करतील. शिक्षण, माहिती- तंत्रज्ञान, दळणवळण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून क्षमता विकास आणि सांस्कृतिक आदान-प्रदानावर विशेष भर दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यात ते २-३ जून रोजी ट्यूनिशियाला भेट देतील. ५० वर्षानंतर उपराष्ट्रपतींची भेटमोरोक्को स्वतंत्र होऊन ५० वर्षे झाली असताना भारताच्या उपराष्ट्रपतींनी या देशाला भेट देण्यालाही ५० वर्षे होणार आहेत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये या आफ्रिकन देशाचा केलेला दौरा पहिली उच्चस्तरीय भेट ठरली होती. दिल्लीत आयोजित शिखर परिदेला मोरोक्कोचे राजे मोहम्मद (सहावे) हे भारताचे पहिले अधिकृत आफ्रिकन पाहुणे ठरले होते. आधुनिक इतिहासात भारत- आफ्रिकन नेत्यांची सर्वात मोठी राजकीय परिषद म्हणून या शिखर परिषदेची नोंद झाली. (वृत्तसंस्था)