शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री ओमपाल मेहरा बडतर्फ

By admin | Updated: December 26, 2015 02:34 IST

अयोध्या येथील राम मंदिर बांधण्यासाठी मुस्लिमांनी मदत करावी, असे आवाहन करणे उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री ओमपाल नेहरा यांना चांगलेच महागात पडले आहे. मुस्लिमांनी ‘कर सेवा’ करावी

लखनौ : अयोध्या येथील राम मंदिर बांधण्यासाठी मुस्लिमांनी मदत करावी, असे आवाहन करणे उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री ओमपाल नेहरा यांना चांगलेच महागात पडले आहे. मुस्लिमांनी ‘कर सेवा’ करावी, असे सांगणारे नेहरा यांची राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी मंत्रिमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी केली.नेहरा हे समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा मिळालेला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी नेहरा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केले,’ अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री राजेंद्र चौधरी यांनी शुक्रवारी दिली. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्या येथे दोन ट्रक भरून दगड आणल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यादव यांनी आपल्या राज्यमंत्र्याविरुद्ध ही कारवाई केली. नेहरा हे राज्याच्या मनोरंजन कर विभागाचे सल्लागार होते. ‘विहिंपसारख्या संघटनांची ओळख पुसून टाकण्यासाठी आता मुस्लिमांनी पुढे यावे आणि अयोध्या व मथुरा येथील वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्यासाठी मदत करावी,’ असे आवाहन नेहरा यांनी गेल्या २३ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात म्हटले होते. ‘राम मंदिर अयोध्येत नाही तर मग कुठे बांधायचे? जेथे कृष्णाची पूजा केली जाते त्या मथुरेत मशीद कशी का राहू शकते? मुस्लिमांनी याचा विचार केला पाहिजे आणि या ठिकाणी मंदिर बांधा असे म्हणत कर सेवेसाठी पुढे आले पाहिजे. आपण विहिंपच्या जाळ्यात अडकता कामा नये,’ असे नेहरा म्हणाले होते. (वृत्तसंस्था)