धक्कादायक! उत्तर प्रदेशात एक हजार मुस्लिमेतरांचे धर्मांतरण, महिलांचे लग्नही लावले; पोलिसांचा खळबळजनक दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 02:23 PM2021-06-21T14:23:05+5:302021-06-21T14:26:44+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधीर लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरण समोर आले आहे. 

Uttar Pradesh Big disclosure of religious conversion police claim one thousand non muslims were converted | धक्कादायक! उत्तर प्रदेशात एक हजार मुस्लिमेतरांचे धर्मांतरण, महिलांचे लग्नही लावले; पोलिसांचा खळबळजनक दावा 

धक्कादायक! उत्तर प्रदेशात एक हजार मुस्लिमेतरांचे धर्मांतरण, महिलांचे लग्नही लावले; पोलिसांचा खळबळजनक दावा 

Next
ठळक मुद्देलालूच दाखवून धर्मांतरण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा  धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरण आले समोरबेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधिर लोकांचे करण्यात येत होते धर्मांतरण

लखनौ - उत्तर प्रदेशात लालूच दाखवून धर्मांतरण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा झाला आहे. उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. यावेळी, जवळपास एक हजार लोकांचे  धर्मांतरण करण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्लीतून आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले. (Uttar Pradesh Big disclosure of religious conversion police claim one thousand non muslims were converted)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधिर लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. याप्रकरणी यूपी एटीएसने दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना लालूच देऊन त्यांचे धर्मातरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरण समोर आले आहे. 

धर्मांतरणानंतर करण्यात आला महिलांचा विवाह -
पोलिसांनी म्हटले आहे, की या धर्मांतरणानंतर संबंधित महिलांचे विवाहदेखील लावून देण्यात आले आहेत. या कामासाठी एक संपूर्ण टोळीच कार्यरत होती. या लोकांचे रॅकेट आणखीही काही राज्यांत सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Uttar Pradesh Big disclosure of religious conversion police claim one thousand non muslims were converted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.