शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 22:53 IST

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स १८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान इटली आणि भारताच्या दौऱ्यावर असतील.

JD Vance's India visit: अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कार्यालयाने बुधवारी ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ वादामुळे जागतिक व्यापारात सुरु असलेल्या गोंधळादरम्यान, जेडी व्हान्स भारतात येत असल्याने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते बैठक देखील करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान जेडी व्हान्स हे काही ठिकाणी भेटी देखील देणार आहेत.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स १८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान इटली आणि भारताच्या दौऱ्यावर असतील. या भेटीदरम्यान, ते त्यांच्या पत्नी उषा व्हान्ससह भारतात येतील, ज्या पहिल्यांदाच सेकेंड लेडी म्हणून भारताला भेट देत आहेत. यादरम्यान, जेडी व्हान्स पंतप्रधान मोदींना भेटतील. व्हान्स दाम्पत्य त्यांच्या तीन मुलांना भारतात घेऊन येण्याची अपेक्षा आहे आणि त्यांचे कुटुंब दिल्लीशिवाय जयपूर आणि आग्रा येथेही जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ यांनीही पुढील आठवड्याच्या सुरुवातीला भारत दौऱ्याची योजना आखली होती, परंतु त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला.

"उपराष्ट्रपती प्रत्येक देशाच्या नेत्यांसोबत सामायिक आर्थिक आणि भू-राजकीय प्राधान्यांवर चर्चा करतील," असे दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतात ते दिल्ली, जयपूर आणि आग्रा येथे भेट देतील. जेडी व्हान्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतील. व्हॅन्स आणि त्याचे कुटुंब भारतातील सांस्कृतिक स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांना देखील उपस्थित राहतील, असेही अमेरिकेच्या निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स २१ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींशी भारत-अमेरिका संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करतील, ज्यात टॅरिफचा मुद्दा आणि द्विपक्षीय व्यापार करारासाठी दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींचा समावेश असणार आहे.

दरम्यान, जेडी व्हान्स २२ ते २३ एप्रिल दरम्यान जयपूरला भेट देऊ शकतात. जेडी व्हान्स हे जंतरमंतर, आमेर किल्ला आणि इतर पर्यटन स्थळांना भेट देण्याची शक्यता  आहे. यासाठी स्थानिक पातळीपासून ते अमेरिकन दूतावासापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. बुधवारी, उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या  भेटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन दूतावास आणि पोलिस अधिकाऱ्यांनी आमेर किल्ल्यावरील सुरक्षेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी आमेर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. सुरक्षा अधिकारी सामान्य पर्यटक बनून आमेर किल्ल्याच्या सुरक्षेची पाहणी करत आहेत. 

 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी