शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांची तब्येत बिघडली, रात्री उशिरा एम्समध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 06:36 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांना पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, उपचारानंतर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री ११ वाजता अमित शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमित शहा यांना श्वास घेताना त्रास जाणवत आहे. अमित शहा यांनी काही काळ रुग्णालयात राहावे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली चांगले उपचार होतील, असे एम्समधील एका सूत्राने सांगितले. दरम्यान, अमित शाह यांना एम्समधील कार्डियो न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, याआधी अमित शहा यांना १८ ऑगस्टला नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली अमित शहा यांच्यावर उपचार सुरु होते. ताप आला होता, त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

अमित शहांना कोरोनाचा संसर्गअमित शहा यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट २ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सामान्यांपासून ते दिग्गजांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. १२ दिवसानंतर म्हणजेच १४ ऑगस्टला अमित शहा कोरोनामुक्त झाले आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

टॅग्स :Amit Shahअमित शहाhospitalहॉस्पिटल