दुर्दैवी...! माझ्यानंतर कोण पाहणार म्हणून इस्रोच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या केली, अमेरिकेत राहणाऱ्या मुलीचा अंत्यसंस्काराला येण्यास नकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:50 IST2026-02-21T11:48:17+5:302026-02-21T11:50:37+5:30

बेंगळुरूमध्ये एका निवृत्त इस्रो कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या केली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलीने अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर बातमी.

Unfortunate...! Retired ISRO employee kills wife to see who will take care of him after him, daughter living in America refuses to attend funeral | दुर्दैवी...! माझ्यानंतर कोण पाहणार म्हणून इस्रोच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या केली, अमेरिकेत राहणाऱ्या मुलीचा अंत्यसंस्काराला येण्यास नकार  

दुर्दैवी...! माझ्यानंतर कोण पाहणार म्हणून इस्रोच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या केली, अमेरिकेत राहणाऱ्या मुलीचा अंत्यसंस्काराला येण्यास नकार  

बेंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधून एक अत्यंत धक्कादायक आणि कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील एका निवृत्त कर्मचाऱ्याने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. मात्र, या घटनेपेक्षाही अधिक चर्चा होत आहे ती या दाम्पत्याच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीच्या भूमिकेची. आपल्या आईचा मृत्यू झाल्याचे समजूनही मुलीने अंत्यसंस्कारासाठी भारतात येण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

बेंगळुरूच्या उत्तर उपनगरात राहणाऱ्या ७० वर्षीय निवृत्त इस्रो कर्मचाऱ्याने आपल्या ६५ वर्षीय पत्नीची हत्या केली. माझ्या पश्चात माझ्या पत्नीला कोणी सांभाळणारे नाही. मी फारतर दोन-तीन वर्षे जगेन. यामुळे तिची हत्या केल्याचे या आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. खरेतर या दाम्पत्याला एक मुलगी आहे जी अमेरिकेत स्थायिक आहे. ती आपल्या आईवडिलांची साधी विचारपूसही करत नसल्याने वडिलांनी हा टोकाचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. वडिलांच्या या दाव्याला आता मुलीनेच खरे ठरविले आहे. 

मुलीचा धक्कादायक निर्णय
या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे. पोलिसांनी जेव्हा तिला या घटनेची माहिती दिली आणि आईच्या अंत्यसंस्कारासाठी भारतात येण्यास सांगितले, तेव्हा तिने येण्यास नकार दिला. हा नकार पोलिसांसाठी देखील धक्कादायक होता. आपल्या जन्मदात्या आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी, कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी तिने येणे गरजेचे होते. परंतू, तिने स्पष्ट नकार कळविल्याने अखेर पोलिसांनी मृत महिलेच्या भावाला बोलवून दोन्ही कुटुंबियांच्या मदतीने सर्व सोपस्कार पूर्ण केले. उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात घडलेल्या या प्रकारामुळे समाजातील वाढते एकाकीपण आणि नात्यांमधील दुरावा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. असे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. 

Web Title : इसरो के सेवानिवृत्त कर्मचारी ने पत्नी की हत्या की; बेटी ने अंतिम संस्कार से इनकार किया।

Web Summary : बेंगलुरु में इसरो के एक सेवानिवृत्त कर्मचारी ने अपनी पत्नी की हत्या कर दी, यह दावा करते हुए कि उसके बाद उसकी देखभाल करने वाला कोई नहीं होगा। अमेरिका में रहने वाली उनकी बेटी ने अंतिम संस्कार में शामिल होने से इनकार कर दिया, जिससे पुलिस हैरान रह गई। महिला के भाई ने अंतिम संस्कार किया, जो सामाजिक अलगाव और तनावपूर्ण रिश्तों को उजागर करता है।

Web Title : ISRO Retiree Kills Wife; Daughter Refuses Funeral, Citing Distance.

Web Summary : A retired ISRO employee in Bengaluru killed his wife, claiming no one would care for her after him. Their US-based daughter refused to attend the funeral, shocking police. The woman's brother completed the rites, highlighting societal isolation and strained relationships.