शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

तापस पाल यांची बिनशर्त माफी

By admin | Updated: July 2, 2014 03:38 IST

चहूबाजूंनी झालेली तीव्र निंदा आणि पक्ष नेतृत्वाकडून झालेली कानउघाडणी यानंतर तृणमूल काँग्रेस खासदार तापस पाल आपल्या वादग्रस्त विधानासंदर्भात बिनशर्त माफी मागितली

नवी दिल्ली : चहूबाजूंनी झालेली तीव्र निंदा आणि पक्ष नेतृत्वाकडून झालेली कानउघाडणी यानंतर तृणमूल काँग्रेस खासदार तापस पाल यांनी मार्क्सवादी महिलांवर बलात्कार करा, या आपल्या वादग्रस्त विधानासंदर्भात बिनशर्त माफी मागितली आहे़ माझ्या वक्तव्यामुळे माझे मतदार आणि बंगालच्या जनतेला मान खाली घालावी लागली़ मी मनापासून त्यांची माफी मागतो, असे पाल यांनी मंगळवारी स्पष्ट केले़पाल यांच्या वक्तव्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर तृणमूल काँग्रेसनेही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत या विधानाबाबत बिनशर्त माफी मागण्याचे आदेश दिले होते़ तत्पूर्वी मंगळवारी राष्ट्रीय महिला आयोगाने पाल यांना संसदेतून बडतर्फ करण्याची मागणी केली़ माकपा, भाजपा आणि काँग्रेसनेही तापस यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी लावून धरली़मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगेन जा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करा, असे संतापजनक अन् तेवढेच निंदनीय विधान लोकप्रिय बंगाली अभिनेते व तृणमूल काँग्रेसचे खा. तापस पाल यांनी केले होते़ आज मंगळवारी देशभर त्याचे पडसाद उमटले़ राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख ममता शर्मा यांनी संसदेतून पाल यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली़ भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्ष्मीकांता चावला यांनी तापस पाल यांना गजाआड पाठविण्याची मागणी केली आहे़ पत्नीचा माफीनामातापस पाल यांच्यापूर्वी त्यांच्या पत्नी नंदिता पाल यांनी पतीच्या विधानाबाबत माफी मागितली़राज्य विधानसभेत गोंधळतृणमूल खासदार तापस पाल यांच्या वादग्रस्त विधानावरून पश्चिम बंगाल विधानसभेत मंगळवारी जोरदार गोंधळ झाला़ (वृत्तसंस्था)