शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसी मोडीत?

By admin | Updated: January 12, 2015 03:50 IST

नेहरू कालखंडात स्थापन केलेला नियोजन आयोग गुंडाळल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार आता त्याच काळात सुरू झालेली विद्यापीठ अनुदान आयोग

नवी दिल्ली : नेहरू कालखंडात स्थापन केलेला नियोजन आयोग गुंडाळल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार आता त्याच काळात सुरू झालेली विद्यापीठ अनुदान आयोग ही आणखी एक संस्था मोडीत काढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जागी अधिक व्यापक अधिकार असलेली ‘उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग’ नावाची नवी नियामक संस्था स्थापन केली जाण्याची शक्यता आहे.सरकारी सूत्रांनुसार, देशातील उच्च शिक्षणाच्या सर्वच शाखांच्या सर्वंकष नियमनाचे अधिकार या नव्या संस्थेस असतील. नियोजन मंडळाच्या ऐवजी स्थापन केलेल्या नीति आयोगाप्रमाणे या नव्या संस्थेवरही स्थायी सदस्य असतील आणि त्यावर राज्यांनाही प्रतिनिधित्व दिले जाईल. बनावट विद्यापीठे स्थापन करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यासह अन्य दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारही या संस्थेस दिले जाऊ शकतील. गौतम समितीने आपले काम पूर्ण केले असून, येत्या महिनाअखेरीस समिती आपला अहवाल सरकारला देईल, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)कसे असेल स्वरूप ?समितीच्या अहवालातील संभाव्य शिफारशी काय असू शकतील, याची माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थायी स्वरूपाच्या आयोगाखेरीज या नव्या नियामक संस्थेची एक नियामक परिषदही असेल. त्यात राज्यांना व अ. भा. तंत्रशिक्षण परिषद, मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया आणि अ. भा. कृषी संशोधन परिषद यासारख्या संस्थांनाही प्रतिनिधित्व दिले जाईल.फेरआढाव्यासाठी नेमली होती समिती१९५६ मध्ये संसदेने कायदा करून विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन झाला, तेव्हा देशात फक्त २० विद्यापीठे व ५०० महाविद्यालये होती. मात्र आज देशात ७२६ विद्यापीठे, ३८ हजार महाविद्यालये आणि त्यात शिकणारे दोन कोटी ८० लाख विद्यार्थी आहेत.