शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

UGC च्या नव्या नियमानं मोठा वाद! खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं आंदोलन; भाजपाविरोधात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:48 IST

दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने यूजीसीला २०१२ च्या जुन्या नियमांत सुधारणा करून जातीभेद संपवण्यासाठी मजबूत व्यवस्था बनवा असं म्हटलं होते.

नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२६ मध्ये बनवलेल्या नव्या नियमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या नियमाचे नाव Promotion of Equity in Higher Education Institutions Regulation 2026 असं आहे. विद्यापीठ आणि कॉलेजमधील जातीभेद रोखण्यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे. या नियमानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये एक इक्विटी कमिटी बनवण्यात येईल. या कमिटीत एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर सुनावणी होईल आणि निश्चित कालावधीत या तक्रारीचा निपटारा केला जाईल. या कमिटीत एससी-एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि महिलांचा समावेश आवश्यक आहे. या कमिटीचं काम विद्यापीठ आणि कॉलेज परिसरात समानतेचे वातावरण तयार करणे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करणे हा आहे.

का बनवला नवीन नियम?

विद्यापीठ अनुदान आयोगाने हा नियम सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर बनवला आहे. सुप्रीम कोर्टाने २०२५ मध्ये रोहित वेमुला आणि पायल तडवीसारख्या प्रकरणात सुनावणी करताना UGC ला ८ आठवड्यात कठोर नियम बनवण्यास सांगितले होते. हैदराबाद यूनिवर्सिटीतील रोहित वेमुला आणि मुंबईत मेडिकल कॉलेजला शिकणारी पायल तडवी या प्रकरणातून जातीभेदानंतर आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले होते. याबाबत दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने यूजीसीला २०१२ च्या जुन्या नियमांत सुधारणा करून जातीभेद संपवण्यासाठी मजबूत व्यवस्था बनवा असं म्हटलं होते.

UGC ने सुप्रीम कोर्टात एक रिपोर्ट सादर केला, ज्यामध्ये जातीभेदाची आकडेवारी देण्यात आली होती. रिपोर्टनुसार, उच्च शिक्षण संस्थेत २०१७-१८ या काळात जातीभेदाच्या १७३ तक्रारी प्राप्त झाल्या. २०२३-२४ या काळात हा आकडा वाढून ३७८ इतका झाला. गेल्या ५ वर्षांत जातीभेदाच्या तक्रारीत ११८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा डेटा यूजीसीने समोर आणला आहे. जो संसदीय कमिटी आणि सुप्रीम कोर्टाला दिला. तक्रारीत ९० टक्क्याहून अधिक निवारण झाले परंतु प्रलंबित तक्रारी वाढत गेल्या. 

नव्या नियमांत काय आहे?

नव्या नियमात जातीभेदाबाबत स्पष्ट व्याख्या दिली आहे. यात SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांविरोधात कुठल्याही प्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि अपमानजनक वर्तणूक ही भेदभाव मानली जाईल. जर एखाद्या विद्यार्थ्याची प्रतिमा किंवा शैक्षणिक असमानता आणत असेल तर तोही भेदभाव मानला जाईल. या तक्रारी कमिटीकडे पाठवल्या जातील आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. 

नव्या नियमाला विरोध का?

यूजीसीच्या या नव्या नियमांविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. हा नियम खुल्या वर्गाविरोधातील आहे. नियमांमध्ये फक्त एससी, एसटी आणि ओबीसीविरोधात भेदभावाचा उल्लेख आहे. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत भेदभाव मानला जाणार नाही ज्यातून हा विरोध आहे. या नियमाचा वापर करून कुणीही विद्यार्थी सवर्ण समाजातील लोकांना फसवण्यासाठी खोटी तक्रार देऊ शकतो. सुप्रीम कोर्टातही याविरोधात याचिका दाखल झाली आहे. यूजीसीचा हा नियम उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेविरोधातील आहेत. या नियमामुळे भेदभाव कमी न होता तो आणखी वाढू शकतो असं आंदोलकांचे म्हणणं आहे. या नियमाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका असल्याने त्यावर कोर्ट काय सुनावणी घेते हे पाहणे गरजेचे आहे. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : UGC's new rules spark controversy; Open category students protest.

Web Summary : UGC's 2026 regulation to prevent caste discrimination in higher education faces opposition. Open category students protest the rule, citing potential misuse and inequality. The rule aims to address grievances of SC, ST, and OBC students following Supreme Court directives.
टॅग्स :universityविद्यापीठcollegeमहाविद्यालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय