शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीकडून दोन सराईत जेरबंद * पिस्तूले जप्त : तळेगाव दाभाडे येथील कारवाई

By admin | Updated: September 26, 2015 19:27 IST

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन सराईतांना जेरबंद केले असून या दोघांकडून २ पिस्तूलांसह ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली. सतेज सुहास यावले (वय २९, रा. तळेगाव दाभाडे) ...


पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन सराईतांना जेरबंद केले असून या दोघांकडून २ पिस्तूलांसह ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली.
सतेज सुहास यावले (वय २९, रा. तळेगाव दाभाडे) आणि विनोद गोपाळ रोहिटे (रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गणेशोत्सव आणि बकरी ईद असल्यामुळे जिल्ह्यामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर बारीक नजर ठेवून कारवाईचे आदेश अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ निरीक्षक राम जाधव, सहाय्यक निरीक्षक होडगर, पोलीस हवालदार एस.ए. जावळे, एस.व्ही. जम, जगदाळे, आर.डी. मिरघे, सी.बी. बागेवाडी, सी.जी. वाघ, पोलिस नाईक डी.एम. बनसुडे, गणेश महाडिक आणि व्ही.जी. गाडे देहूरोड आणि तळेगाव दाभाडे परिसरात गस्त घालीत होते.
आरोपी तळेगाव दाभाडे येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये दोन पिस्तूलांसह ९ काडतुसे मिळून आली. आरोपींची मोटारसायकलसह दोन तलवारी, एक सुरा, कोयता असा एकूण ८१ हजार ५५० रूपयाचा माल जप्त केला आहे. आरोपींवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावर अनेक गुन्हे दाखल आहेत.