बंगळुरू अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक

By Admin | Updated: July 29, 2014 16:59 IST2014-07-29T15:16:38+5:302014-07-29T16:59:55+5:30

बंगळुरू येथील एका शाळेतील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे.

Two more arrested in the rape case of Bangalore minor girl | बंगळुरू अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक

बंगळुरू अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक

>ऑनलाइन टीम
बंगळुरू, दि. २९ - येथील एका शाळेतील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जिम इन्स्ट्रक्टर्सना  अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आधी एका स्केटिंग प्रशिक्षकास अटक केली होती. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून या दोघांना अटक केली असून त्यापैकी एकाने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विबग्योर हायस्कूलमध्ये २ जुलै रोजी एका सहा वर्षाच्या मुलीवर अज्ञात लोकांनी बलात्कार केला होता; परंतु १५ जुलै रोजी हे प्रकरण उघडकीस आले होते. या घटनेमुळे कर्नाटकसह देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. 

Web Title: Two more arrested in the rape case of Bangalore minor girl