शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान कार्यालयात झाल्या दोन महत्त्वाच्या नियुक्त्या; नरेंद्र मोदींच्या खास मर्जीतले अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 06:43 IST

पी.के. मिश्रा नवे प्रधान सचिव, तर पी.के. सिन्हा प्रधान सल्लागार

हरीश गुप्ता नवी दिल्ली : अतिरिक्त प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांना पंतप्रधान कार्यालयामध्ये प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. याआधी या पदावर असलेल्या नृपेंद्र मिश्रा यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या प्रधान सल्लागारपदी पी.के. सिन्हा यांची करण्यात आलेली नियुक्ती मात्र आश्चर्यकारक आहे.

पी.के. मिश्रा यांच्या जागी अतिरिक्त प्रधान सचिवपदी पी.के. सिन्हा यांची निवड होईल, असे मानले जात होते. मात्र, तसे न होता वेगळेच घडले. या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीशी किंवा पुढील आदेश मिळेपर्यंतच्या कालावधीशी निगडित आहेत, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

नृपेंद्र मिश्रा यांनी प्रधान सचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना मोदी इतर काही जबाबदारी देतील, अशी अटकळ बांधण्यात होती. माजी वित्तमंत्री अरुण जेटली राहत होते तो कृष्ण मेनन मार्गावरील ८ क्रमांकाचा बंगला नृपेंद्र मिश्रा यांना देण्यात आला होता. या बंगल्याची दुरुस्ती करण्याचे आदेशही मिश्रा यांनी दिले होते. मात्र, तिथे राहायला जाण्याआधीच त्यांनी प्रधान सचिवपदाचा राजीनामा दिला.पंतप्रधानांच्या खास मर्जीतले अधिकारीबुधवारी झालेल्या दोन नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर यापुढे नवे प्रधान सचिव पी.के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार पी.के. सिन्हा हे मोदी यांच्या खास विश्वासातले अधिकारी पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची भूमिका बजावतील. या कार्यालयात गेल्या आठवडाभरात सहा नव्या नियुक्त्या झाल्या आहेत.

टॅग्स :prime ministerपंतप्रधान