शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू कळमेश्वर नीमजी परिसरातील घटना

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीजवळ नीमजी परिसरात पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून नागपुरातील दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीजवळ नीमजी परिसरात पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून नागपुरातील दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
अलवीना शश्मी शेख (११) आणि बाबू ऊर्फ शहजाद शम्मी शेख (९) रा. एच.बी. टाऊन शांतिनगर अशी मृत मुलांची नावे आहेत.
नीमजी परिसरात काळ्या दगडांची खाण आहे. ती बंद आहे. अवकाळी पावसामुळे या खाणीत पाणी भरून होते. जवळच पंचमुशापीर दर्गा आहे. नागपुरातील शेख कुटुंबीयांनी या दर्गात भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात सहभागी होण्यासाठी ही मुलं कुटुंबीयांसोबत आले होते. मिळालेल्या माहितीनुसार अलवीना व बाबू खेळता-खेळता या खाणीजवळ आले. पाण्यात डोकावून पाहतांना त्यांचे संतुलन बिघडले आणि ते दोघेही पाण्यात पडले. पालकांनी आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांना याची माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलांना बाहेर काढून कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तातडीने नागपूरच्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. नागपुरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु त्यांनी मेयो रुग्णालयात रेफर केले. तिथे डॉक्टरांनी दोन्ही मुलांना तपासून मृत घोषित केले.
पोलीस ठाण्याचा फोन बंद
घटनेनंतर नागरिकांनी कळमेश्वर पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन बंद असल्याने संपर्क होत नव्हता. शेवटी काही नागरिकांनी स्वत: जाऊन पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा मुलांच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.