अंबाझरीतील दोन गुंड हद्दपार

By Admin | Updated: March 1, 2016 01:12 IST2016-03-01T01:12:31+5:302016-03-01T01:12:31+5:30

नागपूर : अंबाझरीतील दोन कुख्यात गुंडांना हद्दपार करण्यात आले असून, एकाला दोन वर्षांसाठी तर एकाला एक वर्षासाठी नागपूर शहर तसेच जिल्‘ात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Two bullets in ambrosia | अंबाझरीतील दोन गुंड हद्दपार

अंबाझरीतील दोन गुंड हद्दपार

गपूर : अंबाझरीतील दोन कुख्यात गुंडांना हद्दपार करण्यात आले असून, एकाला दोन वर्षांसाठी तर एकाला एक वर्षासाठी नागपूर शहर तसेच जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
चंद्रदीप विजय मानेराव (वय २३, रा. जयनगर ट्रस्ट लेआऊट अंबाझरी) आणि दिनेश मधुकर इंगोले (जयनगर, पांढराबोडी) अशी या गुंडांची नावे आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे नागरिकांच्या जानमालास धोका असल्याचे लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांनी या दोघांना हद्दपार करण्याचे आदेश काढले. त्यानुसार या दोघांना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (ता. आष्टी) येथे नेऊन सोडण्यात आले.
---

Web Title: Two bullets in ambrosia