शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन बंद

By admin | Updated: May 12, 2016 22:53 IST

आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन बंद

आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन बंद
जळगाव - महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील फोन गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विभाग सुरू करण्यात आला असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात या विभागाने आपला अहवालही पाठविला मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.
लवादक प्रक्रिया
सुरू करण्याचे पत्र
जळगाव - हंजीर बायोटेकला मनपाने पत्र देऊन ११ तारखेला आपले म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यापूर्वी नोटीस पाठवून २८ मार्च ला हजर रहाण्याचे कळविण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा नोटीस पाठवून ११ रोजी हजर रहाण्याचे कळविण्यात आले होते. त्यावर आता या कंपनीने मनपास पत्र पाठवून लवादकाची प्रक्रिया सुरू करावी असे कळविले आहे. मनपाने याप्रश्नी एक समिती नेमली आहे मात्र तीचे कामकाज अद्यापही सुरू होऊ शकलेले नाही.
पूर नियंत्रण उपायांबाबत मनपास विचारणा
जळगाव - शहरात गेल्या पावसाळ्यात पहिल्याच पावसात दाणादाण उडून काही भागात नाल्यांचे पाणी शिरले होते. यावर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून महापालिका काय उपाय योजना केली याबाबत विचारणा करणारे पत्र जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी मनपास दिले आहे. नाल्यांवरील अतिक्रमणांबाबतही विचारणा करण्यात आली आहे. यावर येत्या दोन दिवसात मनपाकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
लिफ्टबाबत महापालिकेस सूचना
जळगाव - शासनाच्या यांत्रिक विभागातील लिफ्ट निरीक्षक धांबे यांनी मनपास भेट देऊन लिफ्टबाबत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या. मनपाच्या १८ व्या मजल्यावर असलेल्या लिफ्ट कंट्रोल रूममध्ये पोलीस प्रशासनाची वायरलेस यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या फ्रिक्वंसिंचा लिफ्ट यंत्रणेवर परिणाम होऊन भविष्यात दुर्घटना होऊ शकते अशी भीती या अधिकार्‍याने व्यक्त केली असून या दोन्ही यंत्रणा वेगळ्या कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. अपघातग्रस्त तीन क्रमांकाच्या लिफ्टचीही त्यांनी तपासणी करून चाचणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.