शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कसल्याही आव्हानांना तोंड देणारी ट्रम्प यांची बिस्ट कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 02:33 IST

बिस्ट गाडीचा पत्रा हा पाच इंच जाडीचा असून तो अ‍ॅल्युमिनिअम, टिटॅनियम, सिरॅमिक व स्टिल यांच्या मिश्रणाने बनला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगात कुठेही दौऱ्यावर गेले तरी तिथे प्रवास करतात ते बिस्ट नावाने ओळखल्या जाणाºया लिमोझिन गाडीने. या गाडीचे मॉडेल २०१८ सालचे आहे. भारतातही ते याच गाडीने काही ठिकाणी प्रवास करणार आहेत.या बिस्ट गाडीचा पत्रा हा पाच इंच जाडीचा असून तो अ‍ॅल्युमिनिअम, टिटॅनियम, सिरॅमिक व स्टिल यांच्या मिश्रणाने बनला आहे. बॉम्बहल्ल्यापासून या गाडीचे फारसे नुकसान होत नाही व आतील माणसेही सुरक्षित राहातात. या गाडीच्या दरवाजांची जाडी ८ इंच असते. एकदा हे दरवाजे बंद केले आतील माणूस एकदम सुरक्षित असतो. खिडक्यांच्या काचा पाच स्तरीय असून त्या पॉलिकार्बोनेट असतात. ही गाडी संपूर्णपणे बुलेटप्रुफ व बॉम्बरोधकही आहे. काचांपैकी चालकाच्या उजव्या हाताच्या बाजूच्या खिडकीची फक्त उघडते. तीही फक्त ३ इंच. या गाडीचे टायर पंक्चर झाले तरी त्यात असे तंत्रज्ञान वापरले आहे की, गाडी एका जागी न थांबता पुढे धावत राहिल. या कारमध्ये राष्ट्राध्यक्ष व अन्य चार जण बसू शकतात. बिस्ट नावाने ओळखल्या जाणाºया लिमोझिनमध्ये जीपीएस, टीअर गँस कॅनन, टिअर गॅस, अग्निशमन यंत्रणा, स्मोक स्क्रीन डिस्पेन्सर अशा अनेक सुविधा आहेत. आत ड्रायव्हरची केबिन तसेच राष्ट्राध्यक्षांचीही वेगळी केबिन व हाताशी पॅनिक बटणही, सॅटेलाईट फोनही असतोे. ही कार म्हणजे रणगाडाच असल्याचेही म्हटले जाते.अद्ययावत एअर फोर्स वन विमानअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दौऱ्यांसाठी एअर फोर्स वन नावाचे जे विमान वापरतात त्यात दोन किचन, एक मेडिकल आॅपरेटिंग रुम, डॉक्टरसहित एक आॅपरेशन थिएटर अशा सुविधा त्यात आहेत. या विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही सोय आहे. ते जम्बो जेट विमान असले तरी त्यात फक्त ७० जण प्रवास करू शकतात. या विमानात ८५ फोन लाईन्स व १९ टेलिव्हिजन आहेत. कोणत्याही हल्ल्यापासून वाचण्यासाठी या विमानामध्ये विशेष यंत्रणा आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प