शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

त्रिशूळ, वज्राचा प्रहार करणार, ड्रॅगनला अद्दल घडवणार; चीनच्या कपटनीतीविरोधात भारतीय लष्कराला पौराणिक शस्त्रांचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 2:53 PM

Indian Army: गलवानमधील भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते.

नवी दिल्ली - भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अद्याप कायम आहे. गेल्यावर्षीय लडाखमधील  गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने भारतीय जवानांवर काटेरी दांडे. टीझर गन आणि इतर हत्यारे घेऊन हल्ला केला होता. तेव्हा भारताच्या वीर जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला होता. हे तणावाचे वातावरण अद्याप कायम आहे. या घटनेनंतर भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते. ('Trishul' and 'Sapper Punch'- non-lethal weapons-developed by UP-based Apasteron Pvt Ltd to make the enemy temporarily ineffective in case of violent face offs)

सुरक्षा दलांनी कंपनीला कमी प्राणघातक शस्त्रांची ऑर्डर दिली होती. दरम्यान, कंपनीने शिवशंकराच्या त्रिशुळापासून प्रेरणा घेत तसेच एक हत्यार विकसित केले आहे. एपेस्टेरॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मोहित कुमार यांनी एएनआयला सांगितले की, गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर संरक्षण दलांनी आम्हाला कमी प्राणघातक शस्त्रे विकसित करण्यास सांगितले होते. सध्या चिनी सैन्य अशी शस्त्रे बाळगते. 

आम्ही अशी टिझर गन आणि कमी प्राणघातक शस्त्रे बनवली आहेत. जी आमच्या पारंपरिक हत्यारांपासून प्रेरित झालेली आहेत. त्यामध्येच लोखंडाचे काटे असलेला दांडा तयार करण्यात आला आहे. त्याचे वज्र असे नामकरण करण्यात आले आहे. हे हत्यार विरोधी सैनिकांसोबतच्या चकमकीत उपयोगी ठरेल. तसेच याचा वापर करून बुलेटप्रुफ वाहनांना पंचरही करता येते. तसेच या वज्राची खासिय म्हणजे याच्या काट्यामधून विजेचे झटकेही देता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईत प्रतिस्पर्धी सैनिकाला काही काळ बेशुद्ध करता येते.

याशिवाय कंपनीकडून एक त्रिशूळ तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून शत्रूच्या वाहनांना आपल्या क्षेत्रात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी तसेच सैनिकांचा सामना करण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय खास प्रकारचे ग्लव्हज विकसित करण्यात आले आहेत. त्यांचे नाव सॅपर पंच आहे. हे ग्लव्हज हातात घालून समोरील व्यक्तीवर मारल्यास विजेचा धक्का बसतो. त्यामुळे समोरील व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. तसेच थंडीच्या दिवसांत यांचा हातमोजे म्हणूनही वापर होऊ शकतो.

या हत्यारांच्या मारक क्षमतेबाबत मोहित कुमार यांनी सांगितले की, या हत्यारांमुळे कुणाचाही मृत्यू होणार नाही. तसेच कुणी गंभीररीत्या जखमीही होणार नाही. मात्र जेव्हा कधी हातघाईची झटापट होईल तेव्हा ही हत्यारे काही सेकंदात शत्रूला गारद करू शकतील. तसेच ही हत्यारे केवळ संरक्षण दले आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या एजन्सींनाच दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानladakhलडाखchinaचीन