शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

लॉकडाऊनमध्ये आमदाराची गाडी अडवून फाडले चलान, 'या' दबंग महिला IAS अधिकाऱ्याची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 16:06 IST

राजस्थान सरकारने मंगळवारी रात्री उशीरा चित्तौडगड उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या तेजस्वी राणा यांची बदली संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेल्थ इन्शुरन्स एजन्सी पदावर केली.

ठळक मुद्देया अधिकाऱ्याने लाॅकडाऊनचे उल्लंघन केलेल्या काँग्रेस आमदाराच्या कार्यकर्त्याच्या गाडीचे चलान फाडले होतेतेजस्वी राणा, असे संबंधित आयएएस अधिकारी महिलेचे नाव आहेराजस्थान सरकारची ही कारवाई दुर्दैवी असल्याचे केंद्रीय मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत यांनी म्हटले आहे

जयपूर :राजस्थानातील चित्तौडगड येथील उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या आयएएस महिला अधिकाऱ्याची बदली हा चर्चेचा विषय ठरला आहे. या महिला आयएएस अधिकाऱ्याने लाॅकडाऊनचे उल्लंघन केलेल्या काँग्रेस आमदाराच्या कार्यकर्त्याच्या गाडीचे चलान फाडले होते. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा आमदार स्वतः गाडीत होते. राजस्थान सरकारची ही कारवाई दुर्दैवी असल्याचे केंद्रीय मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत यांनी म्हटले आहे. तर राजस्थान सरकार चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी म्हटले आहे. तेजस्वी राणा, असे संबंधित आयएएस अधिकारी महिलेचे नाव आहे.

शेखावत म्हणाले, राजस्थानात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आमचे अधिकारी, प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, चित्तोडगड येथे लॉकडाऊनचे सक्तीने पालन करायला लावणाऱ्या कोरोना योद्धा महिला अधिकाऱ्याची राजकीय कारणांमुळे बदली करणे दुर्दैवी आहे. राजस्थान सरकार यामागचे काहीही कारण सांगो, मात्र संबंधित अधिकाऱ्याची बदली ही घटनेच्या दुसऱ्यात दिवशी झाली. यातून राज्य सरकारची मानसिकता स्पष्ट होते. यामुळे कोरोना व्हायसशी लढणाऱ्या इतर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खचू शकते.

प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले, सरकार चांगले काम करत असलेले अधिकारी आणि लोकांना निशाणा बनवत आहे. अशीच घटना जयपूरमध्येही झाली आहे. येथे राशनच्या दुकानावर काम करणाऱ्या सिव्हिल डिफेन्सच्या लोकांना बाजूला करून दुसऱ्या कडे ते काम देण्यात आले.

अशी घडली होती घटना -राजस्थान सरकारने मंगळवारी रात्री उशीरा चित्तौडगड उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या तेजस्वी राणा यांची बदली संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेल्थ इन्शुरन्स एजन्सी पदावर केली. यानंतर त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. कारण मंगळवारीच तेजस्वी राणा यांनी लॉकडाऊन काळात मुख्य बाजारातून जाणाऱ्या बेगूं येथील आमदार राजेन्द्र सिंह विधूडी यांच्या कार्यकर्त्याच्या गाडीचे चलान फाडले होते.

विधूडी हे कान सिंह भाटी या आपल्या कार्यकर्त्यासोबत त्याच्या गाडीतून चित्तौडगड किल्ल्यापासून सर्किट हाऊस कडे जात होते. या वेळी कान सिंहच गाडी चालवत होता. मात्र, जेव्हा एसडीएमने गाडी आडवून कान सिंहला लायसन्स मागीतले तेव्हा ते त्याच्या जवळ नव्हते. यामुळे राणा यांनी गाडीचे चलान फाडले. याच दिवशी राणा भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांवरही सोशल डिस्टंसिंगच्या मुद्द्यावरून भडकल्या होत्या. यानंतर जेव्हा व्यापाऱ्यांनी पास दाखवले, तेव्हा त्यांनी ते पास फाडले होते. या घटनेनंतरच तेजस्वी राणा यांची बदली करण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे. 

नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानcollectorजिल्हाधिकारीIndiaभारत