शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 21:48 IST

NIA ला उमरच्या दुसऱ्या एका जप्त केलेल्या कारमधून काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि काही आवश्यक वस्तू मिळाल्या आहेत.

दिल्लीतीललाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण कार ब्लास्ट प्रकरणात आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आत्मघाती हल्लेखोर उमर उन नबीच्या एका जवळच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. अमीर राशिद अली (Ameer Rashid Ali) असे त्याचे नाव असून, त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. म्हत्वाचे म्हणजे, या आत्मघाती हल्ल्यात वापरलेली i-20 कार अमीर राशिदच्या नावावर होती, असे NIA च्या तपासात उघड झाले आहे.

अमीर हा कश्मीरमधील संबुरा, पंपोर येथील रहिवासी आहे. त्याने उमर उन नबीसोबत मिळून संपूर्ण स्फोटाचा कट रचला होता. कार खरेदी करण्यासाठी मदतीच्या हेतूने अमीर काही दिवसांपूर्वी दिल्लीत आला होता, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. फॉरेन्सिक अहवालातून, आत्मघातकी हल्लेखोर उमर उन नबी हाच होता, हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. उमर उन नबी पुलवामाचा रहिवासी होता, तो अल-फलाह विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होता.

उमरच्या दुसऱ्या कारमधून काय काय मिळालं? -NIA ला उमरच्या दुसऱ्या एका जप्त केलेल्या कारमधून काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि काही आवश्यक वस्तू मिळाल्या आहेत. १० नोव्हेंबर रोजी झालेल्या या घटनेत १३ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण जखमी झाले होते. 

आंतरराज्यीय नेटवर्क आणि विदेशी कनेक्शन समोर -या प्रकरणी NIA ने आतापर्यंत ७३ हून अधिक साक्षीदारांची चौकशी केली आहे, यात जखमींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तपास आता अनेक राज्ये आणि काही देशांपर्यंत पोहोचला आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांसोबत NIA चे कोऑर्डिनेशनही वाढले आहे. तपास पथक मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी आणि हल्ल्याच्या मास्टरमाइंडला पकडण्यासाठी अनेक राज्यांमध्ये छापे टाकत आहे. या केसमध्ये अनेक आंतरराज्यीय नेटवर्क आणि विदेशी कनेक्शन समोर आले आहेत, ज्यांचा सखोल तपास सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : NIA Arrests Key Aide in Delhi Blast Case; Car Owner Nabbed

Web Summary : NIA arrested Ameer Rashid Ali, a key associate of Delhi blast suicide bomber Umar, from Delhi. Rashid owned the i-20 car used in the blast. Investigations reveal a wider interstate network, with raids underway to nab the mastermind. The blast killed 13 civilians.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटRed Fortलाल किल्ला