शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
3
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:40 IST

Sheikh Hasina Final Verdict, Son Sajeeb Wazed: शेख हसीना यांच्यावरील खटल्याची आज अंतिम सुनावणी

Sheikh Hasina Final Verdict, Son Sajeeb Wazed: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील खटल्याची आज अंतिम सुनावणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) शेख हसीना यांच्यावरील आरोपांवर निकाल जाहीर करणार आहे. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा होईल की नाही हे आज ठरवले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण निकालापूर्वी शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी इशारा दिला आहे की न्यायालय शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देऊ शकते, परंतु त्या भारतात सुरक्षित आहेत. जर त्यांच्या पक्षावरील बंदी उठवली नाही, तर त्यांचे समर्थक पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये अडथळा आणतील, असा इशाराही त्यांनी दिला.

शेख हसीना यांच्यावर कोणते आरोप आहेत?

शेख हसीना यांच्यावर बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात प्राणघातक कारवाईच्या संदर्भात खटला सुरू आहे. त्यांच्याविरुद्धचा पहिला आरोप खून, हत्येचा प्रयत्न, छळ आणि इतर अमानवी कृत्यांशी संबंधित आहे. दुसऱ्या आरोपात असा दावा आहे की हसीना यांनी आंदोलकांना संपवण्याचे आदेश दिले. या आरोपांमध्ये विद्यार्थ्यांना प्राणघातक शस्त्रे वापरण्याचे निर्देश देणे आणि प्रक्षोभक भाषणे देणे यांचा समावेश आहे. इतर आरोपांमध्ये सहा निःशस्त्र आंदोलकांची हत्या आणि गोळीबार यांचा समावेश आहे. शेख हसीना यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, हे सर्व राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हणले आहे.

कदाचित मृत्युदंड, पण माझी आई भारतात सुखरूप!

"आम्हाला नेमका काय निकाल लागणार आहे हे माहित आहे. ते टीव्हीवर दाखवत आहेत. ते शेख हसीना यांना दोषी ठरवतील आणि कदाचित मृत्युदंडाची शिक्षा देतील. पण तरीही ते माझ्या आईला काहीही करू शकत नाहीत. माझी आई भारतात सुरक्षित आहे. भारत तिला पूर्ण सुरक्षा पुरवत आहे," असे वाजेद यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये रॉयटर्सला मुलाखत देताना म्हटले.

शेख हसीना यांचे निर्वासित जीवन

७८ वर्षीय शेख हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर नवी दिल्लीत निर्वासित जीवन जगत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, त्या वर्षी झालेल्या निदर्शनांमध्ये जवळपास १,४०० लोक मारले गेले होते, त्यापैकी बहुतेक जण सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात मारले गेले होते.

अनेक भागात संघर्ष

सजीब वाजेद यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत तरूणांच्या व कार्यकर्त्यांच्या भावनांची माहिती दिली. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनात दडपशाही करण्यात आली आणि त्यात अनेक जण मृत्यूमुखी पडले, यासाठी शेख हसीना यांचे सरकार जबाबदार आहे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरील खटल्याची आज अंतिम सुनावणी होणार आहे. त्याच्याच आधी त्यांच्या मुलाने मुलाखत देत इशारा दिला आहे. शेख हसीना यांच्याविरुद्ध निकालापूर्वी देशातील अनेक भागात हिंसक संघर्ष, जाळपोळ, रास्ता रोको आणि स्फोटही झाले, ज्यामुळे देशभरात असुरक्षितता असल्याची भावना आहे, असे सजीब वाजेद यांनी अधोरेखित केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sheikh Hasina faces verdict; son warns of unrest, cites India safety.

Web Summary : Sheikh Hasina faces a verdict, potentially death. Son Sajeeb Wazed warns of unrest if her party's banned. He claims Hasina is safe in India, receiving protection. Violence already widespread.
टॅग्स :Bangladeshबांगलादेशprime ministerपंतप्रधानagitationआंदोलनElectionनिवडणूक 2024Courtन्यायालय