शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

निवासी भागात विमान कोसळून वैमानिकाचा होरपळून मृत्यू; वाढत्या तापमानामुळे वाचला लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:19 IST

गुजरातच्या अमरेलीमध्ये विमान अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झाला.

Amreli Plane Crash:गुजरातच्या अमरेलीमध्ये विमान अपघाताची भीषण घटना घडली. मंगळवारी दुपारी अमरेलीतील गिरिया रोडवर एका खाजगी कंपनीचे विमान अचानक कोसळले. विमान कोसळले तेव्हा त्यात वैमानिक होता. वैमानिकाचा या अपघातात मृत्यू झाला. एका खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या पायलट प्रशिक्षण केंद्राचे हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्यामुळे विमानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अमरेली अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.

प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान अमरेलीतील एका निवासी भागात कोसळले. विमान एका झाडाला धडकले आणि नंतर एका मोकळ्या जागेवर कोसळले. अज्ञात कारणांमुळे दुपारी १२.३० च्या सुमारास अमरेली शहरातील गिरिया रोड परिसरातील एका निवासी भागात विमान कोसळले, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला. पायलट एकटाच उड्डाण करत होता. या अपघातात इतर कोणीही जखमी झाले नाही. विमान जळून राख झाले, अशी माहिती अमरेलीचे पोलीस अधीक्षक संजय खरात यांनी दिली. 

"या घटनेत प्रशिक्षणार्थी पायलट अनिकेत महाजनचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांसह अग्निशमन विभागाने मदतकार्य सुरू केले. अमरेली विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. शास्त्री नगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि ते आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. दिल्लीस्थित एक विमानचालन अकादमी अमरेली विमानतळावरून पायलट प्रशिक्षण देते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे," असे पोलीस अधीक्षक संजय खरात यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी अपघात झाला त्या अमरेलीतील गिरिया रोड परिसरात सहसा गर्दी असते. मात्र तापमान जास्त असल्याने लोकांची गर्दी तिथे नव्हती. त्याचवेळी हा अपघात झाला. जेव्हा अपघात झाला तेव्हा असे वाटले की जणू काही मोठा स्फोट झाला आहे. जेव्हा घराबाहेर पाहिले तेव्हा  विमान जळताना दिसले. योगायोगाने विमान ज्या भागात कोसळले त्या भागात रहदारी नव्हती, असे एका स्थानिक व्यक्तीने सांगतिले.

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघातfireआग