शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Amritsar Train Tragedy : 'आईचं ऐकलं नसतं तर मलाही ट्रेननं चिरडलं असतं!'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 2:49 PM

अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (19 ऑक्टोबर) रात्री घडली.

अमृतसर : अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (19 ऑक्टोबर) रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. मात्र या दुर्घटनेमधून एक मुलगा केवळ आईच्या सल्ल्यामुळे सुदैवाने वाचला आहे.

Amritsar Train Tragedy: दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार - मुख्यमंत्री अमरिंदर सिंग 

पवन कुमार असं 17 वर्षीय मुलाचं नाव असून तो देखील रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी जाणार होता. मात्र त्याची आई बिट्टू देवी यांनी पवनला घरातील सजावटीचे काम करायला सांगितले. त्यामुळे तो कार्यक्रमाला न जाता घरीच थांबला. 'आईचं ऐकलं नसतं तर मीही ट्रेनखाली चिरडलो गेलो असतो!' अशी प्रतिक्रिया दुर्घटनेनंतर पवन कुमारने दिली आहे. 

Amritsar Train Tragedy: मोटरमनचं 'ते' पाऊल अधिक जीवघेणं ठरलं असतं!

पवनचं घर हे रेल्वे रूळाशेजारीच असल्याने त्याची आई बिट्टू देवी घराच्या गॅलरीत बसून रावणदहनाचा कार्यक्रम पाहत होती. त्यावेळी शेकडो लोक रुळावर उभे राहून हा कार्यक्रम पाहत असल्याच त्यांनी सांगितलं. त्याचदरम्यान समोरून भरधाव वेगाने ट्रेन आली आणि अनेक जण चिरडले गेल्याची त्यांनी महिती दिली. 

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी  या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रेल्वे दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. पीडितांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश आहे. दु:खाच्या प्रसंगी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पाहा, कसा घडला अपघात...

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाAccidentअपघात