शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

केळी पीक विमा योजनेअंतर्गत अडीच कोटींचे वाटप

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

अर्धापूर : तालुक्यातील शेतकर्‍यांना विविध बँकेमार्फत केळी पीक विम्याचे मंजूर झालेले जवळपास अडीच कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़

अर्धापूर : तालुक्यातील शेतकर्‍यांना विविध बँकेमार्फत केळी पीक विम्याचे मंजूर झालेले जवळपास अडीच कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़
तालुक्यातील केळी पिकावर हवामानाचा परिणाम होवून २०१३-२०१४ या वर्षात झालेल्या नुकसानीबाबत केळी पीक विम्यांतर्गत स्टे बँक इंडियाच्या १८ कृषी खातेदारांना ४ लाख ४८ हजार रुपये मंजूर झाले़ स्टेट बँक ऑफ इंडिया मालेगाव शाखेच्या १३ कृषी खातेदारांना २ लाख २० हजार रुपये मंजूर झाले़ स्टेट बँक ऑफ हैदराबाद अर्धापूर शाखेच्या ८ कृषी खातेदारांना १ लाख ५२ हजार २५० रुपये, बँक ऑफ इंडिया अर्धापूर शाखेच्या ७० खातेदारांना २७ लाख १४ हजार ६००, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अर्धापूरच्या २३० खातेदारांना ५६ लाख ७५ हजार २५० रुपये, शाखा लहानच्या ४०८ कृषी खातेदारांना १ कोटी १२ लाख ३० हजार रुपये, मालेगावच्या ४३ कृषी खातेदारांना ७४ लाख ९० हजार रुपये मंजूर झाले़
खरीप हंगामात सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी घोषित झाल्याने शासनाने टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करून टाकली़ त्या अनुषंगाने महसुलात वुट, वीज बिलात सुट, परीक्षा शुल्कात माफी, कृषीपंपाची वीजतोडणी खंडीत न करण्याच्या उपाययोजना उपरोक्त शेतकर्‍यांना केळी पीक विम्याने दिलासा मिळाला आहे़

कोट
यावर्षी ४७५ कृषी खातेदारांनी केळी पीक विमा उतरविला असून त्यापोटी १६ लाख ७५ हजार रुपये विम्याची रक्कम भरली आहे - जी़जी़ चिवटे, शाखाधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, अर्धापूऱ
२०१३-१४ वर्षात मंजूर झालेल्या केळी पीक विम्याची रक्कम खातेदारांना वाटप करण्यात आली आहे - आऱआऱ चेन्नोजी, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, अर्धापूऱ
शेतातील पीक उत्पादनात कमी आलेल्या उतार्‍यामुळे निराश शेतकर्‍यांना केळी पीक विम्याने दिलासा मिळाला - बळीराम पाटील इंगळे, शेतकरी, लहाऩ