शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटांचा हिशेब मागितला

By admin | Updated: June 18, 2014 04:38 IST

अभिनेत्री प्रीती झिंटाच्या तक्रारीनुसार ज्या वेळी उद्योगपती नेस वाडिया यांनी अपमान केला,

मुंबई : अभिनेत्री प्रीती झिंटाच्या तक्रारीनुसार ज्या वेळी उद्योगपती नेस वाडिया यांनी अपमान केला, तेव्हा वानखेडे स्टेडियमच्या गरवारे स्टॅण्डमध्ये कोण कोण उपस्थित होते हे जाणण्यासाठी पोलिसांनी तिकिटांचा हिशोब मागितला आहे.प्रीती सहमालकीण असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे चीफ आॅपरेशन आॅफिसर (सीओओ) फ्रेझर कॅस्टिलेनो, आयपीएलचे सीओओ सुंदर रमण यांना गरवारे स्टॅण्डमधील कॉर्पोरेट बॉक्समधली तिकिटे कोणाकोणाला दिली होती, ही माहिती देण्याची विनंती पोलिसांनी केल्याचे समजते. घटना घडली (३० मे) तेव्हा पंजाब विरुद्ध चेन्नई असा सामना सुरू होता. कॉर्पोरेट बॉक्समधली तिकिटे ज्यांच्या हाती पडली आणि जे तेथे उपस्थित होते अशांकडे या घटनेबाबत चौकशी होऊ शकते, त्यापैकी काहींचे जबाब नोंदवून त्यांना साक्षीदारही केले जाऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. या घटनेची तक्रार रमण यांच्याकडे केल्याचा दावा प्रीतीने आपल्या तक्रारीत केला होता. तो खरा असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते. सामना संपल्यानंतर मैदानात प्रीतीने रमण यांच्याकडे वाडियांची तक्रार केली. तेव्हा रमण ‘कीप इट कूल, थिंक अबाऊट इट अ‍ॅण्ड देन डिसाइड’, असे प्रीतीला म्हणाले होते, असेही सूत्रांकडून समजते. रमण परदेशात असून ते मुंबईत आले की पोलीस त्यांचा जबाब नोंदविणार आहेत. रमण यांच्याआधी प्रीतीने वाडियांची तक्रार अध्यक्ष रंजीब जैस्वाल यांच्याकडे केली होती. (प्रतिनिधी)