दुचाकीच्या अपघातात तीन महिलांसह चौघे जखमी

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:35+5:302014-12-20T22:27:35+5:30

स्लग- पिंजर येथील घटना

Three women, including two women, were injured in a bike accident | दुचाकीच्या अपघातात तीन महिलांसह चौघे जखमी

दुचाकीच्या अपघातात तीन महिलांसह चौघे जखमी

लग- पिंजर येथील घटना
अकोला : मागच्या सीटवर बसलेल्या महिलेचा साडीचा पदर चाकात गुंडाळल्या गेल्याने भरधाव दुचाकी रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात दुचाकीचालकासह तीन महिला जखमी झाल्याची घटना शनिवार, २० डिसेंबर रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरनजीक अकोला मार्गावर घडली.
प्राप्त माहितीनुसार, पिंजर येथील हरीश बेलखेडे हे सकाळी त्यांची पत्नी संगीता व गावातील सुनंदा उंडाळे, अर्चना लोणाग्रे या तिघींना घेऊन अकोला मार्गावरील नेमाडे यांच्या शेतात कामासाठी दुचाकीने जात होते. वडगाव फाट्याजवळ सुनंदा उंडाळे यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला. यामुळे दुचाकी रस्त्यावर कोसळली. यात चौघांनाही किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच संत गाडगेबाबा पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकार्‍यांनी जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Three women, including two women, were injured in a bike accident