दहशतवाद्यांचे तीन अड्डे उध्वस्त

By Admin | Updated: May 24, 2014 04:35 IST2014-05-24T04:34:02+5:302014-05-24T04:35:55+5:30

सुरक्षा दलाने काश्मीर खोर्‍यात गेल्या २४ तासात दहशतवाद्यांचे तीन अड्डे ध्वस्त केले असून, मोठ्या प्रमाणात सशास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला

Three of the terrorists in the airport collapsed | दहशतवाद्यांचे तीन अड्डे उध्वस्त

दहशतवाद्यांचे तीन अड्डे उध्वस्त

श्रीनगर : सुरक्षा दलाने काश्मीर खोर्‍यात गेल्या २४ तासात दहशतवाद्यांचे तीन अड्डे ध्वस्त केले असून, मोठ्या प्रमाणात सशास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. बारामुल्ला जिल्ह्णातील पट्टाण परिसरातील पोशवानी येथे सशास्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा असल्याची गुप्तचर विभागाने माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांनी शुक्रवारी संयुक्त शोधमोहीम राबवली. यावेळी सुरक्षा दलाने दोन एके ४७ रायफल, तीन मॅगझीन आणि ७९ गोळ्या जप्त केल्या. याशिवाय आरपीजी, युबीजीएल, आयईडी सर्किट आणि १०० ग्राम स्फोटक तसेच चार हातगोळे जप्त करण्यात आले. दुसर्‍या कारवाईत कुपवाडा जिल्ह्णाच्या बिसावली जंगलात दहशतवाद्यांच्या अड्ड्यातून सुरक्षा दलाने दोन एके रायफल, तीन मॅगझीन, २२१ एके गोळ्या, सहा पिस्तुल आणि ८० गोळ्या जप्त केल्या. आणखी एका संयुक्त कारवाईत सुरक्षा दलाने कुपवाडा जिल्ह्णातील हंदवाडा परिसरातील ओखापानी जंगलात दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश केला. येथून १०० किलोहून अधिक धान्य, स्वयंपाकाचे तेल व मसाल्याचे पदार्थ जप्त करण्यात आले. (वृत्तसंस्था) (वृत्तसंस्था)

Web Title: Three of the terrorists in the airport collapsed