शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Chariot Festival : कोरोनाची भीती नाही! रथोत्सवात हजारोंची गर्दी, भाविकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:12 IST

Karnataka Chariot Festival : चिकमंगळूर जिल्ह्यात श्री शकुन रंगनाथ स्वामी मंदिरात रथोत्सवात शेकडो लोकांनी सोशल डिस्टंसिंग नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. स्थानिक प्रशासनाने मिरवणूक न काढण्याचे आदेश दिल्यानंतरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बंगळुरू: देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि ओमायक्रॉनच्या  (Omicron) प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाही, लोक कोरोना नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. असे असतानाही ठिकाणी हजारो लोकांनी गर्दी (Mass Gathering) करत एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला. विशेष म्हणजे त्यापैकी बहुतेकांनी मास्कही घातलेले नव्हते. 

चिकमंगळूर जिल्ह्यात श्री शकुन रंगनाथ स्वामी मंदिरात रथोत्सवात शेकडो लोकांनी सोशल डिस्टंसिंग नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. स्थानिक प्रशासनाने मिरवणूक न काढण्याचे आदेश दिल्यानंतरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक पोलिसांनी सर्व कार्यक्रम आणि राजकीय रॅलींवर बंदी घालण्याचा आदेश जारी केल्यानंतर काही तासांनी हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. चिकमंगळूरच्या उपायुक्तांनी स्थानिक तहसीलदारांना जारी केलेल्या आदेशात मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली होती आणि उत्सव मंदिराच्या आवारात आयोजित केला जाऊ शकतो, परंतु 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकत नाहीत, असे म्हटले होते. 

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रथ गर्दीच्या परिसरातून जात असल्याचे दिसत आहे. रथाच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने लोक आहेत, जे रथ पोहोचल्यानंतर प्रार्थना करताना दिसतात. लोकांचा एक समूह खांद्याला खांदा लावून उभा असतो कारण ते दोरीने रथ ओढतात. या गर्दीत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे दिसून येत आहे. पुजारी आणि इतर तीन लोकही रथात एका छोट्या जागेवर बसलेले आहेत, तेही मास्कशिवाय दिसत आहेत.

कर्नाटकात संसर्गाचे प्रमाण 12.45 टक्केसोमवारी कर्नाटकमध्ये  27 हजारांहून अधिक नवीन  कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकात संसर्गाचे प्रमाण 12.45 टक्के आहे. राज्यात 24 तासांत संसर्गामुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून सक्रिय रुग्णांची संख्या 2,17,297 आहे. तर देशात कालच्या तुलनेत आज काही प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 38 हजार 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 310 जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकcorona virusकोरोना वायरस बातम्या