तिसरी आघाडी लवकरच अस्तित्वात येणार -चौटाला

By Admin | Updated: February 20, 2015 02:10 IST2015-02-20T02:10:08+5:302015-02-20T02:10:08+5:30

भाजपच्या घोडदौडीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसेतर पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांंना वेग दिला जात आहे.

Third front will come into existence soon - Chautala | तिसरी आघाडी लवकरच अस्तित्वात येणार -चौटाला

तिसरी आघाडी लवकरच अस्तित्वात येणार -चौटाला

चंदीगड : भाजपच्या घोडदौडीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसेतर पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांंना वेग दिला जात आहे. तिसऱ्या आघाडीचा पर्याय मजबूत ठरू शकतो, असा दावा इंडियन नॅशनल लोकदलाच्या राजकीय व्यवहार समितीचे सदस्य अभयसिंग चौटाला यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत लवकरच तिसरी आघाडी स्थापन होईल.
लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, शरद यादव व मुलायमसिंगसारखे नेते तसेच अनेक पक्ष व पूर्वाश्रमीच्या जनता दल परिवारातील सर्व घटकांचा त्यात समावेश असेल.
जनतेला भाजप आणि काँग्रेसच्या सरकारांचा वीट आला असून तिसरी आघाडी स्थापन न झाल्यास जनता आम्हाला माफ करणार नाही. लोकांना तिसरा पर्याय हवा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या आघाडीत नेतृत्वाच्या मुद्यावर मतभेद असल्याचा त्यांनी इन्कार केला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Third front will come into existence soon - Chautala