तिस:या गूढ रजिस्टरमागे सीबीआय प्रमुखांची पत्नी?

By Admin | Updated: September 6, 2014 02:55 IST2014-09-06T02:55:45+5:302014-09-06T02:55:45+5:30

सीबीआय संचालक रंजित सिन्हा यांना संकटात टाकणा:या तिस:या गूढ रजिस्टरमागे त्यांची पत्नी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Third: CBI chief's wife is behind this mystery register? | तिस:या गूढ रजिस्टरमागे सीबीआय प्रमुखांची पत्नी?

तिस:या गूढ रजिस्टरमागे सीबीआय प्रमुखांची पत्नी?

नवी दिल्ली : सीबीआय संचालक रंजित सिन्हा यांना संकटात टाकणा:या तिस:या गूढ रजिस्टरमागे त्यांची पत्नी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऐसपैस असलेल्या निवासस्थानी येणा:यांची नोंद ठेवण्याची कल्पना त्यांच्या पत्नीची होती काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 
आपल्या घरी दोन नोंदवह्या आहेत. त्यामध्ये त्यांचे कार्यक्रम आणि सुरक्षेसंदर्भातील तपशील आहे; पण अभ्यागतांच्या नोंदी असलेल्या तिस:या नोंदवहीबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचा सिन्हा यांनी दावा केला आहे. सिन्हा यांच्या पत्नीच्या आग्रहास्तव अनधिकृत नोंदी ठेवण्यात येत असाव्यात आणि हीच तथाकथित तिसरी नोंदवही असावी, असे संकेत सीबीआय आणि आयटीबीपीच्या सूत्रंकडून मिळत आहेत.
सिन्हा यांच्या पत्नीच्या अनौपचारिक विनंतीवरून इंडो-तिबेट सीमा पोलीसचे (आयटीबीपी) कर्मचारी नोंदवही बाळगत असण्याची शक्यता आहे. सिन्हा सीबीआय प्रमुखपदी नियुक्त होण्यापूर्वी आयटीबीपीचे प्रमुख होते. त्यांच्या जिवाला धोका असल्यामुळे त्यांना आयटीबीपीच्या जवानांची सुरक्षा आहे. (वृत्तसंस्था) 

 

Web Title: Third: CBI chief's wife is behind this mystery register?