they keep weapons at mosques karnataka bjp leader renukacharya controversial statement muslim | मुस्लिम मशिदीत शस्त्रास्त्रं ठेवतात, त्यांना जागा दाखवणार, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान 
मुस्लिम मशिदीत शस्त्रास्त्रं ठेवतात, त्यांना जागा दाखवणार, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान 

ठळक मुद्देकर्नाटकातल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. देवनागरेमध्ये एका रॅलीला संबोधित करताना रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांवर गंभीर आरोप केला आहे.मुस्लिम लोक मशिदीमध्ये शस्त्रास्त्रं जमवून ठेवतात. मुस्लिमांना मी त्यांची जागा दाखवून देणार आहे.

बंगळुरूः कर्नाटकातल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. देवनागरेमध्ये एका रॅलीला संबोधित करताना रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांवर गंभीर आरोप केला आहे. मुस्लिम लोक मशिदीमध्ये शस्त्रास्त्रं जमवून ठेवतात. मुस्लिमांना मी त्यांची जागा दाखवून देणार आहे. राजकारण काय असतं ते लवकरच समजेल, असा धमकीवजा इशाराच भाजपाच्या कर्नाटकातील आमदारानं मुस्लिमांना दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातल्या राजकारणातही खळबळ उडाली आहे.
 
देवनागरेच्या होनाली येथे सोमवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम समुदायातील लोक मशिदीत नमाज पठण करण्याऐवजी शस्त्रास्त्रं गोळा करून ठेवतात. इथे काही जण देशद्रोही आहेत. तुम्ही लोक मशिदीत बसता आणि फतवे काढता?, मशिदीत काय तर शस्त्रास्त्रं गोळा केली जात आहेत. त्यासाठी तुम्हाला मशीद हवी आहे काय?, जर तुम्हाला असंच काही तरी करायचं असल्यास ठीक आहे. मी माझं राजकारण करत राहीन, असंही रेणुकाचार्य म्हणाले आहेत. 

रेणुकाचार्य हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याजवळचे समजले जातात. रेणुकाचार्य पुढे म्हणाले, मी मुस्लिमांसाठी मिळालेला निधी हिंदूंवर खर्च करण्यासाठी अजिबात मागे-पुढे पाहणार नाही. मी तालुक्यात मुस्लिमांसाठी मिळालेला निधी हिंदूवर खर्च करणार आहे. भाजपाचे आमदार एम. पी. रेणुकाचार्च यांना येडियुरप्पा सरकारमध्ये कॅबिनेटचा दर्जा मिळालेला आहे. रेणुकाचार्य हे वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात. रेणुकाचार्य यांच्या आधी भाजपाचे आमदार सोमशेखर रेड्डी यांनीसुद्धा बेल्लारीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मुस्लिम समुदायाविरोधात विधान केलं होतं. आम्ही 80 टक्के आहोत, तुम्ही फक्त 17 टक्के आहात, विचार करा, जर सीएए लागू झाला तर तुमचे काय हाल होतील?, सावध राहा, असंही सोमशेखर रेड्डी म्हणाले होते. 

Web Title: they keep weapons at mosques karnataka bjp leader renukacharya controversial statement muslim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.