शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

या आठ राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 12:52 PM

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग 14 जून रोजी आठ राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याचा निर्णय घेणार आहे. देशातील आठ राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक घोषित करत कायदेशीर हक्क बहाल करा, अशा आशयाची मागणी करणारी जनहित याचिका भाजपानं केली होती.

नवी दिल्ली- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग 14 जून रोजी आठ राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याचा निर्णय घेणार आहे. देशातील आठ राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक घोषित करत कायदेशीर हक्क बहाल करा, अशा आशयाची मागणी करणारी जनहित याचिका भाजपानं केली होती. परंतु या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी देण्यास नकार दिला आहे. तसेच न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले होते की, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने यासंदर्भात निर्णय घ्यावा, याचिकाकर्त्याने त्यांच्याकडे हा विषय उपस्थित करावा, अशीही सूचना न्यायालयानं केली होती. परंतु आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग 14 जून रोजी यावर निर्णय घेणार आहे.या याचिकेत जम्मू-काश्मीर, पंजाब, लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या आठ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला जावा, अशी विनंती केली होती. अश्विनीकुमार उपाध्याय यांच्या या याचिकेत वरील राज्यांत हिंदू हे अल्पसंख्य आहेत. केंद्र सरकारने अल्पसंख्य विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी 20 हजार शिष्यवृत्ती उपलब्ध केल्या आहेत.जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम 68.30 टक्के असून, सरकारने 753 शिष्यवृत्यांपैकी 717 मुस्लीम विद्यार्थ्याना दिल्या आहेत, परंतु एकाही हिंदू विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती नाही, असे याचिकेत म्हटले होते. केंद्र सरकारने 1993मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी यांना भारतात अल्पसंख्याकांचा दर्जा दिला गेला आहे व 2014मध्ये या यादीत जैनांचाही समावेश केला गेला.कोणत्या राज्यात किती प्रमाणसन 2011मध्ये झालेल्या जनगणनेचा हवाला देऊन याचिकेत म्हटले होते की, 8 राज्यांत हिंदू अल्पसंख्य आहेत. लक्षद्वीप 2.5 टक्के, मिझोराम 2.75, नागालँड 8.75, मेघालय 11.53, जम्मू व काश्मीर 28.44, अरुणाचल प्रदेश 29, मणिपूर 31.90 व पंजाब 38.40 टक्के, तर लक्षद्वीपमध्ये 96.20, जम्मू व काश्मीरमध्ये 68.30, आसाम 34.20, पश्चिम बंगाल 27.5, केरळ 26.60, उत्तर प्रदेश 19.30 आणि बिहार 18 टक्के मुस्लिमांची संख्या आहे.