शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सर्वत्र पाणीच पाणी दुसर्‍या दिवशीही सूर्यदर्शन नाही : सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ रिपरिप, आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: July 12, 2016 00:07 IST

जळगाव : रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा दुसर्‍या दिवशीही मुक्काम कायम असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुसर्‍या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ पावसाची रिपरिप सुरू असल्याने आता सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. या पावसामुळे शहरातील पवन नगर भागात घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. तसेच आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळी कार्यालयामध्ये जाणार्‍यांसह शाळकरी विद्यार्थ्यांचेही हाल झाले.

जळगाव : रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा दुसर्‍या दिवशीही मुक्काम कायम असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुसर्‍या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ पावसाची रिपरिप सुरू असल्याने आता सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. या पावसामुळे शहरातील पवन नगर भागात घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. तसेच आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळी कार्यालयामध्ये जाणार्‍यांसह शाळकरी विद्यार्थ्यांचेही हाल झाले.
गेल्या आठवड्यात रविवारी व सोमवारी झालेल्या दमदार पावसानंतर गायब झालेला पाऊस रविवारी सकाळी झडी घेऊनच आला. १० जुलै रोजी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आणि दिवस व रात्रभर तो सुरूच राहिला. सोमवारीदेखील दिवसभर या पावसाचा मुक्काम कायम होता. सोमवारी दुपारी केवळ बारा ते एक वाजे दरम्यान थोडा कमी झाला. मात्र रात्रीपर्यंत रिपरिप सुरूच होती.

दुसर्‍या दिवशीही सूर्यदर्शन नाही....
रविवारी सु˜ीवर गेलेले सूर्यनारायण दुसर्‍या दिवशीही उगवले नाही. त्यामुळे सलग दुसर्‍या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही.

गारवा वाढवा....
सततच्या पावसामुळे तापमानातही कमालीची घट होऊन दिवसादेखील गारवा जाणवत होता. या वातावरण बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.

सर्वत्र पाणीच पाणी....
यंदा या पूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी चांगलीच वाढली असून त्यात आता दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भिजपावसामुळे जमिनीतही पाणी मुरत नसल्याने शहरातील सखल भागासह रस्त्याच्या कडेला, नाले, खड्यांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
नवीपेठेत जयप्रकाश नारायण चौकात सरस्वती डेअरीनजीकच्या सखल भागात पाणी साचले होते. गटारीचे पाणी काही प्रमाणात रस्त्यावर आले होते. गोलाणी मार्केटजवळ शिरपूर बँकेनजीक मुख्य रस्त्यावर, स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या भिंतीनजीक, जिल्हा क्रीडा संकुल परिसरात पाणी साचले होते.
पिंप्राळा रेल्वे गेटनजीक दोन्ही बाजूला पाणी तुंबलेले होते. फाटक बंद असताना वाहनधारकांना या पाण्यातच उभे रहावे लागत होते. केसी पार्कनजीक रस्त्यावरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. या रस्त्यावरून केसी पार्क, त्रिभुवन कॉलनी भागातील नागरिकांसह कानळदा, आव्हाणे आदी ठिकाणचे ग्रामस्थ ये-जा करतात. शिवाजीनगर पूल पार केल्यानंतर भिकमचंद जैन शाळेसमोर मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.