शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:10 IST

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटातील मुख्य आरोपी उमर उन नबी यांचा सहकारी आमिर राशिद अली याला आता पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटातील मुख्य आरोपी उमर उन नबी यांचा सहकारी आमिर राशिद अली याला आता पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सध्या १० दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान आता त्याच्या सरकारी वकिलांचे वक्तव्य समोर आले आहे. आमिर राशिद अली याला भेटून आल्यानंतर त्याचे वकील म्हणाले की, त्यांनी त्याच्याशी संवाद साधला मात्र या दरम्यान त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप नव्हता. इतकंच नाही तर त्याला पुढे काय होईल याचीही चिंता नव्हती. आपण काय गुन्हा केलाय याची त्याला काही कल्पनाच नव्हती. जणू काही झालंच नाही, अशा अविर्भावात तो होता. 

वकील स्मृती चतुर्वेदी  म्हणाल्या की, पुढील तपासासाठी एनआयएने आमिर राशिद अलीची कोठडी मागितली आहे. पुढील तपासासाठी त्याची कोठडी मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. आमिरची चौकशी केली असता, त्याने सांगितले की, लाल किल्ला स्फोटात वापरलेल्या कारचा तो नोंदणीकृत मालक आहे. या सगळ्या चौकशी दरम्यान आमिर राशिद अलीच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते, त्याला स्वतःच्या गुन्ह्याचा पश्चात्ताप देखील होत नव्हता.

एनआयएने सोमवारी दिल्लीतील एका न्यायालयात म्हटले की, १० नोव्हेंबर रोजी शहरातील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील प्रमुख आरोपी आमिर राशिद अली याने दिल्ली स्फोटातील आत्मघातकी बॉम्बर डॉ. उमर उन नबी याला घर आणि इतर मदत पुरवली होती. आमिरच्या कोठडीसाठीच्या अर्जात, एनआयएने म्हटले आहे की, संपूर्ण कट उलगडण्यासाठी आरोपीला कोठडीत घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. 

एनआयएने अर्जात म्हटले आहे की, हल्ल्यात वापरलेल्या कारचा नोंदणीकृत मालक आमिरने उमरला रसद पुरवल्याचा आरोप आहे. स्फोटाच्या आधीच्या दिवसांत आमिरने उमरसाठी एक सुरक्षित घराची व्यवस्था देखील केली होती, असा दावा त्यात करण्यात आला आहे. एजन्सीने अर्जात म्हटले आहे की हे कट जाणूनबुजून जनतेच्या मनात भीती, चिंता आणि दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आले होते.कथित कटाचे गांभीर्य अधोरेखित करताना एनआयएने म्हटले आहे की ही घटना देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका निर्माण करण्याच्या आणि अस्थिर करण्याच्या उद्देशाने होती. पुढील तपासासाठी आमिरला काश्मीरला नेण्यात येईल, असेही एजन्सीने न्यायालयाला सांगितले.          

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi blast accused showed no remorse, says his lawyer.

Web Summary : Amir Rashid Ali, arrested in connection with the Delhi blast, showed no remorse or concern, according to his lawyer. He is accused of providing support to the bomber and owning the car used.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटcarकारRed Fortलाल किल्ला