LPG Crisis: देशात एलपीजीचा मुबलक साठा, मग गॅस एजन्सीबाहेर रांगा का? जाणून घ्या नेमकं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:54 IST2026-03-13T18:51:45+5:302026-03-13T18:54:56+5:30

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचताना दिसत आहे. इंधन पुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीपोटी देशभरातील विविध शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत.

There is ample supply of LPG in the country, so why are there queues outside gas agencies? Know the real reason! | LPG Crisis: देशात एलपीजीचा मुबलक साठा, मग गॅस एजन्सीबाहेर रांगा का? जाणून घ्या नेमकं कारण!

LPG Crisis: देशात एलपीजीचा मुबलक साठा, मग गॅस एजन्सीबाहेर रांगा का? जाणून घ्या नेमकं कारण!

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचताना दिसत आहे. इंधन पुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीपोटी देशभरातील विविध शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारने देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात गॅसचा पुरवठा थांबेल, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून गरजेपेक्षा जास्त बुकिंग केले जात आहे. आकडेवारीनुसार, दिवसाला साधारण ५५ लाख सिलिंडरचे बुकिंग होत असे.  मात्र, अफवांमुळे हा आकडा अचानक ७५ लाखांच्या पार गेला आहे.

गॅस एजन्सींबाहेर रांगा का? 

देशात मुबलक साठा उपलब्ध असूनही केवळ पॅनिक बुकिंगमुळे यंत्रणेवर ताण आला आहे. अचानक वाढलेल्या बुकिंगमुळे गॅस एजन्सींच्या घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. घरपोच सिलिंडर मिळण्यास उशीर होईल या भीतीने लोक स्वतः एजन्सीवर जाऊन रांगा लावत आहेत. घरातील सिलिंडर संपण्याआधीच नवीन सिलिंडर पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात मागणीत मोठी वाढ झाली आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाचे स्पष्टीकरण

"भारताकडे सध्या इंधनाचा पुरेसा साठा आणि पर्यायी पुरवठा मार्ग उपलब्ध आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जर तुमच्याकडे गॅस शिल्लक असेल, तर विनाकारण बुकिंग करू नका. सर्वांनी नियमाप्रमाणे बुकिंग केल्यास पुरवठा साखळी पुन्हा पूर्ववत होईल", असे स्पष्टीकरण पेट्रोलियम मंत्रालयाने दिले आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

- सोशल मीडियावरील अनधिकृत मेसेजेसवर विश्वास ठेवू नका.
- केवळ गरजेनुसारच गॅस सिलिंडर बुक करा.
- पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा.

Web Title : एलपीजी का भंडार भरपूर, फिर भी गैस एजेंसी पर कतारें क्यों?

Web Summary : एलपीजी का पर्याप्त भंडार होने के बावजूद, सोशल मीडिया अफवाहों से फैली दहशत के कारण गैस एजेंसियों पर लंबी कतारें लग रही हैं। सरकार ने पर्याप्त ईंधन का आश्वासन दिया है और आपूर्ति सामान्य करने के लिए जिम्मेदार बुकिंग करने का आग्रह किया है।

Web Title : LPG Stockpile Abundant, Panic Buying Fuels Gas Agency Queues: Why?

Web Summary : Despite ample LPG reserves, panic buying triggered by social media rumors has caused long queues at gas agencies. The government assures sufficient fuel and urges responsible booking to normalize supply chains and avoid unnecessary strain.